पाचोरा – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा. येथे आज शाळेतील कलादालन येथे आजी आजोबा दिवस उत्साहात संपन्न करण्यात आला. शाळेतील संगीत शिक्षक सागर थोरात यांनी स्वागतगीत गाऊन मान्यवरांचे स्वागत केले . कार्यक्रमाला आलेल्या आजी आजोबांचे शाळेतर्फे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापिका प्रमिला वाघ यांनी आपल्या मनोगत आजी आजोबांचे महत्त्व व सध्या एकत्र कुटुंब पद्धत दुर्मिळ होत चालली असून आजी आजोबांचे विचार प्रेरणादायी ठरतात. हाच उद्देश शासनाने ठेवून हा दिवस साजरा करण्याचे चांगले कार्य केले आहे. वाढत्या वृद्धाश्रमांची संख्या पाहता विद्यार्थ्यांनी या गोष्टीचा विचार करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाला उपमुख्याध्यापक एन आर पाटील, ज्येष्ठ शिक्षिका संगीता वाघ, शितल महाजन, ज्योती ठाकरे, कलाशिक्षक प्रमोद पाटील, व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थी मनोगतात स्तवन भट या विद्यार्थ्याने आजी आजोबा बद्दल आदर व्यक्त करून कृतज्ञता व्यक्त केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.बी.बोरसे यांनी तर आभार ज्योती ठाकरे यांनी मानले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377