आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
देश विदेशमहाराष्ट्र
Trending

आता मतदार केंद्राचे सुसूत्रीकरण ; एका मतदान केंद्रावर १५०० मतदार !

जळगाव,दि.11सप्टेंबर – मतदार याद्या पडताळणीबरोबरच आता मतदान केद्रांचे सुसूत्रीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरी भागात आता एका मतदान केंद्रात पंधराशे मतदार असणार आहेत.

राज्यात सध्या मतदार पडताळणीची मोहीम सुरू आहे. ही मोहीम १५ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार असून, १७ ऑक्टोबर रोजी मतदार यादीचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध केला जाणार आहे. मतदार पडताळणीच्या या मोहिमेसोबतच मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्याचे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. मतदार केंद्र सुसूत्रीकरण करून प्रत्येक केंद्रावर फक्त १५०० मतदार मतदान करतील अशी रचना करण्याचे सूचीत केले आहे.

असा असेल कालबध्द कार्यक्रम

■ १७ ऑक्टोबर रोजी मतदार यादीचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध केला जाणार आहे.

■ १७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या काळामध्ये पुन्हा नवीन अर्ज स्वीकारले जातील. यासाठी विशेष ग्रामसभा, शिबिरे, महाविद्यालयांमध्ये नोंदणी मोहीम अशा स्वरूपाच्या उपक्रमांतून नवमतदार जोडले जाणा- आहेत.

■ या सर्व नवीन अर्जाची नोंदणी १७ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप आराखड्यात केली जाणार आहे.

■ ५ जानेवारी २०२४ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. ही मतदार यादी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी वापरली जाणार आहे.

ही काळजी घेतली जाणार !

■ हे मतदान केंद्र देताना त्या मतदान केंद्रातील एक विशिष्ट भाग दुसऱ्या मतदान केंद्रात हलविला जाईल, हे मतदार हलविताना एखाद्या सोसायटीचा शेवटचा मतदार आकडा १५०० होत असेल तर उर्वरित सोसायटीधारकांना त्याच मतदार केंद्रावर मतदानांची संधी मिळणार आहे‌. एका सोसायट्यांमधील मतदार एकाच मतदान केंद्रात असतील, याची काळजी घेतली जाणार आहे.

■ जुन्या मतदान केंद्रात सुविधा अपूर्ण असल्यास व नवीन ठिकाणी त्या सुविधा मिळत असल्यास अशा मतदान केंद्रांना नवीन जागेत हलविण्यात येणार आहे. ही प्रक्रिया १५ ते ३० सप्टेंबरपर्यंत सबंध राज्यात राबविण्यात येणार आहे.

■ मतदार पडताळणीची मोहीम १५ सप्टेंबरला संपल्यानंतर १६ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर या काळामध्ये मतदार याद्यांची दुरुस्ती, नवमतदार नोंदणी, नावे वगळणे पत्त्यात दुरुस्ती, फोटो बदलणे अशा स्वरूपाची कामे केली जाणार आहेत. अशी माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी दिली आहे.

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: CALL ME 8411009377 \\\\