आयुष्यमान भव: योजनेत जळगाव राज्यात अग्रेसर ठरेल – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा विश्वास
आयुष्मान कार्डाचे घरोघरी वाटप करा आयुष्यमान भव’ मोहिमेचा पालकमंत्र्यांचे हस्ते शुभारंभ
जळगाव, दि.18 सप्टेंबर : जळगाव जिल्हा विविध योजना व उपक्रमांच्या अंमलबजावणीत कायम अग्रेसर राहिला आहे. ‘आयुष्यमान भव:’ या योजनेत ही जिल्ह्याचे काम राज्यात अग्रेसर ठरेल, असा विश्वास राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांला पाच लाखांपर्यंत मोफत उपचार देणारे ‘आयुष्यमान कार्ड’ चे घरोघरी वितरण करण्याचे काम प्रशासनाने करावे. असे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले.
‘आयुष्मान भव:’ अभियानांचा जळगाव जिल्ह्याचा शुभारंभ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी, कर्मचारी, आशासेविका, नागरिक यांच्यांशी फेसबुक लाईव्हद्वारे थेट संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित आदी यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आयुष्मान भारत आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे जिल्ह्यात चांगले काम होत आहे. उर्वरित नागरिकांनाही या दोन्ही योजनेची ओळखपत्रे काढून द्या. वैद्यकीय सेवा आणि औषधोपचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवा. आपली जबाबदारी मानून गोरगरिबांची सेवा प्रामाणिकपणे करा, असेही त्यांनी सांगितले.
‘आयुष्यमान भव: ‘एक देशव्यापी अभियान आहे. प्रत्येक गाव आणि शहरात आरोग्य सेवा प्रदान करणे. हा या अभियानाचा उद्देश असून या माध्यमातून स्वच्छता अभियान, आयुष्यमान सभा, अवयव दान मोहीम, रक्तदान शिबिर, अंगणवाडी मधील मुलांची तपासणी यासारखे उपक्रम राबवून जिल्ह्यातील नागरिकांना चांगल्या प्रकारचे आरोग्य मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहावे. जिल्ह्यातील प्रत्येकाने सहभागी होऊन ‘आयुष्यमान भव:’ ही मोहीम लोक चळवळ म्हणून उभी करावी. शंभर टक्के ही मोहीम यशस्वी करावी. असा सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी केल्या.
राज्यात आजपासून १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान ‘आयुष्मान भव’ मोहीम राबवली जाणार आहे. असे नमूद जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, आयुष्यमान कार्डसाठी आपल्या जिल्ह्याचे उद्दिष्ट १४ लक्ष ६८ हजार ६२५ आहे. त्यापैकी चार लक्ष ९१ हजार ६७४ कार्ड वितरित करण्यात आलेले आहेत. उर्वरित कार्डधारकांना या मोहिमे दरम्यान आयुष्यमान कार्ड काढून देण्यासाठी सर्व आशा स्वयंसेविका कर्मचाऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन करत स्वच्छता अभियान, आयुष्यमान मेळावा, रक्तदान मोहीम, अवयवदान मोहीम, आयुष्यमान सभा, “आयुष्यमान आपल्या दारी ” अंगणवाडी, प्राथमिक शाळांमध्ये मुलांची तपासणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून सदर अभियान यशस्वीपणे राबवण्याचे आवाहन त्यांनी केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित म्हणाले. ‘आयुष्मान भव:’ ही केंद्र शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी मोहीम आहे. ३१ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेमध्ये आयुष्मान आपल्या दारी , आयुष्मान मेळावा, आयुष्यमान सभा, अंगणवाडी व शाळेतील मुलांची तपासणी या योजनाच समावेश आहे. आयुष्मान मेळाव्यात रक्तदान व शस्त्रक्रिया शिबिरे आयोजित केले जाणार आहेत. आयुष्मान सभा अंतर्गत २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने गाव पातळीवर आयुष्मान सभांचे आयोजन केल्या जाणार असून सर्व आजाराची माहिती देणे तसेच आयुष्मान बाबत जनजागृती करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377