पाचोरा लालबागचा राजा गणेश मंडळ येथे बाजार समिती सभापती गणेश पाटील यांच्या हस्ते सपत्नीक आरती संपन्न
पाचोरा – येथील सुप्रसिद्ध व नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असलेला पाचोरा लालबागचा राजा येथील गणपतीची आरती साठी पंचक्रोशितील विविध सामजिक ,राजकीय, व्यावसायिक मान्यवरांना बोलविले जात असते त्यांना या मंडळातर्फे आरतीचा मान दिला जात असतो दहा दिवस चालणाऱ्या या गणेशोत्सवाच्या काळात या ठिकाणी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम,सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रम शिवाय करमणुकीसाठी येथे विविध प्रकारचे साहित्य विक्रीचे दुकाने ,खेळण्याचे दुकाने आणि पाळणे, आदी प्रकारचे मनोरंजनात्मक खेळ येथे आलेले असतात याचा आनंदही भक्तगण लुटाताना येथे दिसतात.
येथील लालबागच्या राजाची गणेशमूर्ती ही 22 फुटी असून शहरातील सर्वात मोठे मूर्तीचा मान लाभलेला आहे, तसेच शहरातील ग्रामीण भागातूनही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गणरायाच्या दर्शनास अलोट गर्दी होत असते असे असताना या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ही चौख बजावताना पोलीस बांधव येथे कार्यरत असतात .मंडळातील सर्वच सदस्य आपापल्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडत असतात.सदर मंडळातील गणरायाचे बाबत सांगायचे झाल्यास येथील गणपती बाप्पा हा नवसाला पावणारा असे धारणा असल्याने अनेक भक्तगण येथे नवस कबूल करताना दिसतात शिवाय ज्यांचा नवस पूर्ण झालेला असेल तेही या ठिकाणी येऊन आपली मानता पूर्णत्वास आल्याने आपापल्या परीने या गणराया चरणी नतमस्तक होऊन कबूल केलेली मानता किंवा इच्छा पूर्ण करताना दिसतात अनेक दानशूर लोक येथे आपल्या परीने प्रसाद व देणगी स्वरूपात सहकार्य करत असतात. पाचोरा लालबागचा राजा येथील सभा मंडप आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्फत विकसित करण्यात आले असून भविष्यात येथे अजून कामे व निधी मंजूर करून हा ओपन स्पेस सुशोभित होणार असल्याचे मंडळातील सदस्यांनी सांगितले तसेच या लाडक्या बाप्पाचे विसर्जन मिरवणूक दिनांक 28 रोजी अनंत चतुर्दशीला निघणार असल्याचे अध्यक्ष व सदस्य यांनी जाहीर केले असून तमाम गणेश भक्तांनी सहभागी होण्याचे आवाहनही मंडळातर्फे करण्यात आले आहे
पुढील काळात येणारे सण ,शेतकरी व शेती हंगाम , व्यापार, राजकिय व सामाजिक व्यक्ती,सर्व भक्तगण आदींना येणारे वर्ष सुख समृद्धीचे भरभराटीचे जावो असे सदिच्छा श्री चरणी अर्पण करून पाचोरा लालबाग राजाला निरोप देण्यात येणार आहे.पाचोरा लालबाग राजा चॅरिटेबल ट्रस्ट सर्व पदाधिकारी ,सदस्य,रहिवासी व सर्व भक्तगण यांच्या सहकार्याने हा गणेशोत्सव साजरा होत असतो
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377