सामनेर सोसायटीच्या चेअरमन पदी माणिकराव पाटील तर व्हा.चेअरमन पदी शारदाबाई चव्हाण यांची बिनविरोध निवड.
पाचोरा (सामनेर),ता.14- सामनेर प्राथमिक कृषी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन सुनील हरी पाटील व व्हा. चेअरमन अण्णा पवार ठरल्याप्रमाणे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला होता. 13 रोजी निवडणूक कार्यक्रम प्रक्रियेत निवृत्त माध्यमिक शिक्षक श्री आबासो माणिकराव माधवराव पाटील (सेवानिवृत्त शिक्षक)यांचा चेअरमन पदासाठी तर शारदाबाई एकनाथ चव्हाण यांची व्हा. चेअरमन पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी संचालक मंडळातील बाळकृष्ण साळुंखे, साहेबराव पाटील, रवींद्र साळुंखे पंढरीनाथ पाटील, दगा भिल, अण्णा पवार ,सुनील पाटील,विजय पाटील, मयूर पाटील,रेखाबाई नेरपगार, लीना सोनकुळ संचालक उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार विभागाचे अधिकारी दीपक पाटील यांच्या अध्यक्ष खाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. चेअरमन माणिकराव पाटील व व्हा चेअरमन शारदाबाई चव्हाण यांचा गावातील नागरिकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच पती भोलेनाथ भिल ग्रामपंचायत सदस्य महेंद्र साळुंखे प्रा. राजेंद्र साळुंखे, गोरख नेरपगार,एकनाथ चव्हाण सुनील साळुंखे, प्रमोद पाटील, प्रशांत साळुंखे,सचिव छगन गवळी लिपीक अविनाश पाटील प्रताप पाटील आदी उपस्थित होते. फोटो – सामनेर सोसायटी चेअरमन माणिकराव पाटील ,व्हा चेअरमन शारदाबाई चव्हाण यांच्या निवड झाल्याबद्दल सत्कार प्रसंगी संचालक ,पदाधिकारी व ग्रामस्थ
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377