पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यात अभिमान राबविले जाणार
नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना मिळणार
जळगाव, दि.१४ ऑक्टोंबर – महाराष्ट्र राज्य उद्योजकता अभियान राज्यात सुरू करण्यात येत असून या अभियानाचा पहिला टप्पा १६ ऑक्टोंबर सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यातील सहा पथदर्शी जिल्ह्यांमध्ये जळगाव जिल्ह्याचा समावेश झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना मिळणार असून रोजगार निर्मितीत भर पडणार आहे.
महाराष्ट्र राज्य उद्योजकता मिशनच्या या पहिल्या टप्प्यात राज्यातील नागपूर, ठाणे, जळगाव, अहमदनगर, चंद्रपूर व अमरावती या जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम (SEEID) मंत्रालयाने ग्लोबल अलायन्स फॉर मास एंटरप्रेन्योरशिप (GAME) सोबत महाराष्ट्र राज्य उद्योजकता मिशन राबविण्याचा करार केला आहे.
सोमवार, १६ ऑक्टोंबर २०२३ रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते या अभियानाचे मुंबई येथून सुरूवात होत आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात निवड करण्यात आलेल्या सहा जिल्ह्यातील जिल्हाधिकारी या कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी होणार आहेत.
उद्योजकतेला चालना देणे आणि एमएसएमई (msme) क्षेत्रावर लक्ष केंद्रित करून त्यांच्या क्षमतांना तांत्रिक सहाय्याद्वारे प्रोत्साहन देणे आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करण्याच्या उद्देशाने प्रत्येक जिल्ह्याचे ‘ग्रोथ हब’ मध्ये रूपांतर करणे हे या मिशनचे उद्दिष्ट आहे. मिशन सर्व संबंधित संसाधने जसे की वित्त, बाजारपेठेपर्यंत प्रवेश, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना, शैक्षणिक संस्था, इनक्यूबेटर, प्रवेगक आणि प्रत्येक जिल्ह्यातील उद्योग नेते एकत्रित करेल, प्रत्येक जिल्ह्याच्या प्रमुख सामर्थ्य आणि आवश्यकतांचा लाभ घेत कार्यक्रमांची अंमलबजावणी करणार आहे. अशी माहिती राज्याच्या कौशल विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाचे आयुक्त डॉ.रामास्वामी एन यांनी दिली आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377