जिल्ह्यात २४ गावांत कौशल्य विकास केंद्रे पंतप्रधानांच्या हस्ते उद्या होणार ऑनलाईन उद्घाटन
जळगाव,दि.१८ ऑक्टोंबर – ग्रामीण भागातील युवक-युवतींना रोजगारासाठी शहरांमध्ये जावे लागते. अशावेळी गावातच रोजगार निर्माण करण्याचा पहिला टप्पा म्हणून त्यांना स्थानिक पातळीवर कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना असून, त्या अंतर्गत महाराष्ट्रात ५०० गावात यामध्ये जळगाव जिल्ह्यात २४ ग्रामपंचायतीत कौशल्य विकास केंद्र सुरू होणार आहेत. या केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन गुरूवारी,१९ ऑक्टोंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
जिल्ह्यात उद्घाटन होत असलेल्या २४ ग्रामपंचायतीच्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऑनलाईन ऐकण्याची व्यवस्था राहणार आहे. १९ ऑक्टोंबर २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजता कार्यक्रम ऑनलाईन पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे जिल्ह्यातील निमंत्रक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहायक आयुक्त वि.जा.मुकणे हे आहेत.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377