आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र

मंगळागौर स्पर्धा 2023 संपन्न नारीशक्ती सदैव वंदनीय आहे! माननीय सौ. वैशालीताई सुर्यवंशी


पाचोरा:- येथे मंगळागौर कार्यक्रम 2023 चे आयोजन माननीय सौ. वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी शिवसेना नेत्या पाचोरा भडगाव यांच्या प्रमुख नेतृत्वात शिवसेना युवासेना महिला आघाडी (उबाठा) च्या वतीने दिनांक 19/10/2023 व 20/10/2023 दोन दिवसीय विविध महिला स्पर्धांचे आयोजन संपन्न झाले असून, महिला स्पर्धा बक्षिसे वितरण सोहळा दिनांक 20/10/2023 रोजी सायंकाळी शिवसेना च्या धडाडीच्या नेत्या माननीय सौ. वैशालीताई सुर्यवंशी, शिवसेना महिला जिल्हा संघटिका मा. सो. महानंदा ताई पाटील, ज्येष्ठ मार्गदर्शक मा. कमलताई पाटील मा. सौ. डॉ. सुवर्णाताई पाटील, भडगाव आणि योजना ताई पाटील भडगाव आदी मान्यवरांच्या शुभहस्ते भरघोस बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला. यावेळी महिला भगिनींचा आनंद गगनात मावत नव्हता. बक्षीस वितरण सोहळा प्रसंगी माननीय सौ. वैशालीताई सुर्यवंशी म्हणाल्या की, आपण मंगळागौर 2023 दोन दिवसीय महिला स्पर्धांमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने कुटुंबाची जबाबदारी सांभाळून स्पर्धेत सहभागी झालात प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ व पंचम तथा उत्तेजनार्थ सहभागाचे बक्षीस प्राप्त केले याचा मला एक महिला म्हणून सार्थ अभिमान वाटतो. तुमच्या सर्वांचे मनापासून अभिनंदन करते आभार व्यक्त करते.
स्त्री म्हणजे उत्तम कलागुणांचा, त्यागाचा, समर्पणाचा, मेहनतीचा, मातृत्वाचा, वात्सल्याचा, परमेश्वराचा अनुपम अविष्कार आहे. आपल्यातील सुप्त गुणांना अतिशय सुंदरपणे व्यक्त केले. कलेच सादरीकरण खूपच भावलं. आपल्यातील कलागुणांची जोपासना करा. आपल्या मुलाबाळांना पतींना सासू-सासर्‍यांचा चांगला सांभाळ करा. सामाजिक बांधिलकी जोपासा. शेजार धर्म पाळा. एकमेकांच्या सुखात दुःखात सहभागी व्हा. मी देखील तुमच्या सारखी एक स्त्री आहे माझा उद्योग व्यवसाय सांभाळून देखील माननीय शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे तथा माझे पिताश्री स्वर्गीय तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांच्याकडून प्रेरणा घेऊन 80% समाजसेवा 20% राजकारण हा मंत्र ध्यानी घेऊन समाजसेवा करायचा विनम्र प्रयत्न करीत आहे. राजकारणासोबत माझे समाजकारण देखील चालू आहे. आपण सर्वांची साथ व खंबीर पाठिंबा माझ्यासोबत असू द्या. दर महिन्याच्या 2 तारखेला शिवसेना मध्यवर्ती कार्यालय पाचोरा व 4 तारखेला शिवसेना मध्यवर्ती कार्यालय भडगाव येथे मोफत मोतीबिंदू तपासणी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन असते आपले नातेवाईक, सोयरे व मित्रमंडळी यांना पाठवा. मंगळागौर सन 2023 च्या भव्य महिला स्पर्धेत आपण विजयी व सहभागी झालात प्रेषक म्हणून उपस्थित राहिल्यात तुम्हा सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते.
यावेळी शिवसेना महिला संघटक जळगाव माननीय सो. महानंदाताई पाटील, ज्येष्ठ मार्गदर्शक मा. श्रीमती कमलताई पाटील, मा. सो. योजना ताई पाटील भडगाव, मा. सुवर्णाताई पाटील भडगाव, उपजिल्हा संघटिका मा. सो. तिलोंत्तमा मौर्य, मंदाकिनी पारोचे, कुंदन पंड्या, जयश्री येवले, अनिता पाटील, शिवसेना युवाचे पदाधिकारी सर्व सपत्नीक उपस्थित होते व महिला आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते मंगळागौर सन 2023 भव्य महिला स्पर्धेचं परीक्षक म्हणून माननीय सो. स्वाती गिरीश कुलकर्णी, माननीय सो. आदिती कुलकर्णी व माननीय सौ. वनिता भट होते, परीक्षकांनी उत्तम प्रकारे कला गुणांचे,देहबोली, वेशभूषा, सादरीकरण, आदी बाबींचा उत्तम निकष लावून आपला निकाल जाहीर केला. कार्यक्रम यशस्वीते साठी शिवसेना युवा सेना महिला पदाधिकारी व कार्यालय कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: CALL ME 8411009377 \\\\