महाराष्ट्र
पाचोरा येथे जागतिक दिव्यांग दिवस साजरा

पाचोरा-दिनांक 3 डिसेंबर 2023 ला येथील तहसील कार्यालयातील प्रांगणात झालेल्या प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने आज जागतिक दिव्यांग दिवस साजरा करण्यात आला यावेळी अध्यक्षस्थानी भाजपाचे तालुका अध्यक्ष अमोल भाऊ शिंदे होते,प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार प्रवीण चव्हाणके पोलीस उपनिरीक्षक योगेश गगणे , नायब तहसीलदार बी.डी.पाटील दिव्यांग कक्ष अधिकारी आबासाहेब काशिनाथ महाले. माजी सभापती बन्सीलाल पाटील भाजपाचे शहराध्यक्ष दीपक भाऊ माने प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष महेश गोंड उपाध्यक्ष राजू अहिरे शहराध्यक्ष शौकत तकारी उपाध्यक्ष अनिल लोणारी महिला तालुका अध्यक्ष संगीता ठाकूर यांच्यासह असंख्य दिव्यांग बांधव व महिला उपस्थित होत्या.सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना Udid कार्ड मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
पाचोरा येथे जागतिक दिव्यांग दिवस साजरा
पाचोरा शहरातील प्रवीण चव्हाणके यांनी तहसीलदार कार्यालयातील दिव्यांगांच्या विविध योजनांची माहिती दिली व शासन आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल भाऊ शिंदे यांनी दिव्यांग दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या व विविध समस्या सोडवण्याची ग्वाही दिली .माजी सभापती बन्सीलाल बापू पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



