जुनी पेन्शन योजनेसाठी आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत आम्ही खंबीरपणे उभे आहोत
पाचोरा, दि 14 डीसे.- 2005 नंतर सरकारी कर्मचारी म्हणून रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी पाचोरा पंचायत समिती येथे सरकारी कर्मचारी आंदोलन करत आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे राज्यभर आंदोलन सुरू आहे मात्र दरवेळी राज्य शासन फक्त आश्वासनांची खैरात करते. कर्मचाऱ्यांना कुठलेही ठोस उत्तर देत नाही त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये विद्यमान सरकार विरोधात प्रचंड असंतोष आहे. त्यातूनच संपाचा इशारा सरकारी कर्मचाऱ्यांनी दिला. जुन्या पेन्शन आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा असून आम्ही मा. श्री. उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे देत आहोत . जुन्या पेन्शन योजनेसाठी सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसोबत ठामपणे उभे आहोत.
वास्तविकश्री उद्धव ठाकरे साहेबांचे महाविकास आघाडी सरकार असताना सरकारी कर्मचाऱ्यांची कुठल्याही पद्धतीने पिळवणूक केली गेली नाही. त्या वेळी सरकारी कर्मचाऱ्यांची अनेक दिवसापासून ची मागणी होती ही शासकीय कामाचा आठवडा हा पाच दिवसांचा करावा. ही मागणी उद्धव ठाकरे साहेबांनी मान्य करून सोमवार ते शुक्रवार असा पाच दिवसांचा शासकीय कामाचा आठवडा गेल. सोबतच कोरोणासारखी अत्यंत गंभीर जागतिक महामारी आलेली असताना, सर्व सरकारी कार्यालये,सर्व राज्य बंद असताना, प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारात कुठलीही कपात न करता त्यांना पगार दिला गेला. याची जाणीव सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना आहे हे चर्चेतून जाणवलं. हे सर्व सरकारी कर्मचारी श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे नेहमीच आभार मानत असतात.
सध्याचे सरकार कर्मचाऱ्यांची पिळवणूक करत आहे.त्यांनी कर्मचाऱ्यांच्या भविष्याच्या विचार करून जुनी पेन्शन योजना त्वरित लागू करावी यासाठी श्री.मनोहर चौधरी, श्री .विजुभाऊ साळुंखे, श्री .पप्पू दादा, श्री. दिपकभाऊ पाटील, सौ .योजनाताई पाटील, श्री. डी. डी. पाटील, श्री. व्ही. एच. पाटील सर, श्री. जे. के. पाटील यांच्या समवेत आंदोलन भेट दिली
पंचायत समिती आवारात सुरू असलेल्या आंदोलनात श्रीमती मनिषा सैंदाणे, कनिष्ठ लेखाधिकारी,श्री अजित ठगणासिंग चव्हाण, वरिष्ठ सहा (लेखा),श्री सुनिल पवार,श्री धिरज पाटिल, श्री सतिष गढरी,श्री दिपक वाणी,श्री अमोज चव्हाण, श्री ईश्वर देशमुख,श्री सागर लाडवंजारी, श्री धोंडीराम राठोड, सोनवणे साहेब,श्रीमती वृषाली पवार,श्रीमती सुरेखा बोटले, श्रीमती कोष्टी मॅडम, श्रीमती भारती वाडेकर, श्रीमती प्रतिमा महाजन, श्री आर डी जगताप, श्री दिलीप चिंचोरे.ग्राम पंचायत विभाग,आरोग्य विमाग,कृषी विभाग, बांधकाम विभाग,शिक्षण विभाग,सिंचन विभाग, ICDI विभाग कर्मचारी यांचा सक्रिय सहभाग होता.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377