
पाचोरा- पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले. त्यांनी आमदार किशोर पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले.वाघ म्हणाले, “आमदार किशोर पाटील यांनी गेल्या चार वर्षांत एकही आमसभा घेतली नाही. त्यामुळे जनतेशी त्यांचा संपर्क तुटला आहे. सट्टा, पत्ता, वृक्षतोड, रेती यासारख्या समस्यांवर त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. सर्व विभागातील अधिकारी मुजोरी वाढली आहे. पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल होत नाही. साफसफाईची व्यवस्था नाही.
“आमदारांनी केलेल्या कामांचं कौतुक आहे. पण कामाचा दर्जा राखला जात नाही. त्यामुळे तातडीने आमसभा घेऊन जनतेला विश्वासात घेण्याची गरज आहे. शासनाने ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम राबवला. पण त्यानंतर काही कार्यक्रम झाले नाहीत. अजित पवार यांनी सूचना देऊनही अधिकारी काम करत नाहीत. बिल भरावे म्हणून फोर्स केली जाते.
“पीकविमा मिळाला नाही. कापूस खरेदीसाठी कृषी विभागाला सांगितले तरी काही कारवाई केली जात नाही. अधिकारी संख्या पुरेशी नाही. वचक बसत नसेल तर आमदारांनी आमसभा घ्यावी. 15 दिवसाच्या आत आमसभा घ्यावी.”
वाघ यांनी पत्रकार परिषदेत आणखी काही मुद्दे मांडले. ते म्हणाले, “पाचोरा शहरात सार्वजनिक स्वच्छता नाही. पाणीपुरवठ्याची समस्या आहे. शिक्षणाचा दर्जा घसरला आहे.
“पाचोरा-भडगाव मतदारसंघात शेतीचा व्यवसाय आहे. पण शेतकऱ्यांना पीकविमा मिळत नाही. कापूस खरेदीसाठी शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होते. अवैध वाहण धारक हे कॉलेज ते जळगाव चौफुली रोडवर वाहने लावतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. “पाचोरा-भडगाव मतदारसंघात अधिकारी संख्या पुरेशी नाही. त्यामुळे कामे होत नाहीत. वचक बसत नसेल तर आमदारांनी आमसभा घ्यावी.”
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



