युवासेनेच्या जिल्हाप्रमुख पदी जितेंद्र जैन; लोकसभा संपर्क प्रमुख सुनील चौधरी यांचे कडून घोषणा
पाचोरा दि,७ – आगामी निवडणुकांसाठी शिवसेना शिंदे गट सरसावला असून संघटना बांधणीच्या अनुशंगाने शिवसेनेतील युवकांचे भक्कम संघटन असलेल्या युवासेनेच्या बळकटी साठी पाचोरा येथील जितेंद्र जैन यांची जळगाव जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. जळगाव येथील अजिंठा विश्राम गृह येथे लोकसभा संपर्क प्रमुख संजय चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकसभा संपर्क मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेनेचे जळगाव लोकसभा अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.यावेळी बोलतांना संपर्क प्रमुख चौधरी यांनी जैन यांच्या निवडीची घोषणा केली. यावेळी त्यांचा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, आमदार किशोर अप्पा पाटील,शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील,महानगर प्रमुख निलेश पाटील, उपजिल्हा प्रमुख गणेश पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
निवडणुकांच्या काळात अधिकाधिक युवकांना पक्षासोबत जोडून पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्याचा मानस यावेळी जितेंद्र जैन यांनी व्यक्त केला असून आपल्याला दिलेल्या महत्वपूर्ण जबाबदारी बद्दल त्यांनी पक्षाच्या वरीष्टांसह आमदार किशोर पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377