श्रीराम मंदिर प्रतिष्ठापने निमित्त 22 जानेवारी रोजी पाचोरा शहरातील सर्व मद्य विक्री व मांस विक्री दुकाने बंद ठेवावी- भाजपा पाचोरा यांची मागणी
पाचोरा – अयोध्या नगरीमध्ये ५०० वर्षाच्या संघर्षानंतर व न्यायालयीन लढाईनंतर प्रभू श्रीराम लल्लांची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी २०२४ सोमवार,रोजी होणार आहे.त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण असून ठिकठिकाणी मंदिरांना रंगोटी लायटिंग पताके सजावट कलश यात्रा कीर्तने अशा वेगवेगळ्या कारक अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. या भक्तीमय वातावरणात 22 जानेवारी रोजी घरोघरी दिवाळी साजरी करण्याचे आवाहन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी पाचोरा शहर यांच्या माध्यमातून पाचोरा शहरातील सर्व मद्य विक्री दुकाने,बार आणि मांसविक्री करणारे सर्व दुकाने २२ जानेवारी २०२४ सोमवार रोजी संपूर्ण दिवस बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.
त्या आशयाचे निवेदन आज भाजपा शहर पदाधिकाऱ्यांच्या वतीने पाचोरा नगरपरिषद व पाचोरा पोलीस स्टेशन यांना देण्यात आले.याप्रसंगी शहराध्यक्ष दिपक माने,जगदीश पाटील,समाधान मुळे,विष्णू अहिरे,स्वप्नील सोनार,योगेश ठाकूर,राहूल गायकवाड,विरेंद्र चौधरी,प्रदिप पाटील,मनीष भावसार,सोहन मोरे,गोकुळ दारकुंडे,आशिष जाधव,अमोल वाघ आदी पदाधिकारी उपस्थित होते.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377