VR, IOT, रोबोटिक्स सारखे क्षेत्रात योग्य ज्ञान घेतल्यास करिअर मध्ये उंच भरारी घेता येईल- संजयजी वाघ:
पाचोरा – येऊ घातलेले नविन तंत्रज्ञान भविष्यासाठी फार अत्यावश्यक आहे, आरिवु सेतु सारखे उपक्रम विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त ठरतात असे मार्गदर्शन या प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलतांना पाचोरा तालुका सह. शिक्षण संस्थेचे चेअरमन संजयजी वाघ यांनी सांगीतले.
श्री.गो.से.हायस्कूल पाचोरा येथे आरिवु सेतूचे उदघाटन पाचोरा तालुका सह. संस्थेचे चेअरमन संजयजी वाघ, यांचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी स्कुल कमिटी चेअरम खलील देशमुख, मुख्याध्यापिका प्रमिला वाघ , उपमुख्याध्यापक एन.आर.ठाकरे, पर्यवेक्षिका अंजली गोहिल, एस एन पाटील,मनीष बाविस्कर, पी एम पाटील, संगीता वाघ, रुपेश पाटील , संजय करंदे व माहीती तंत्रज्ञान क्षेत्रातील मार्गदर्शक उपस्थित होते.
पाचोरा शहरात आरिवु सेतू Technology on wheels द्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन:-
पाचोरा शहरातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान व भविष्याचा अचूक वेध घेणारे विविध टेक्नॉलॉजी ची माहिती व्हावी या उद्देशाने एमकेसीएल,पुणे
रोटरी क्लब ऑफ धुळे क्रॉस रोड यांच्या संयुक्त विद्यमाने आरिवु सेतूदरा मार्गदर्शन करण्यात आले.
भविष्यात अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स, IOT, वर्चुअल रियालिटी, VR ओर्ग्युमेंटेड रियालिटी, AI,ऑटोमोशन मध्ये सेन्सर्स चे महत्व, स्मार्ट फार्मिंग, 3 D Printing, एर्गोनॉमिक्स , सायबर सिक्युरिटी, गेमिंग सेन्सर्स, क्लिनिंग रोबोट, ऍडव्हान्स सोलर सिस्टम , जगातील सर्व भाषां मधील रोबोटिक्स आणि त्याचे महत्व अशा विविध विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. मार्गदर्शनासाठी धुळे येथून आलेले टिम समवेत, आशीर्वाद कम्प्युटर्स चे संचालक अतुल शिरसमणे, अजिंक्य कासार बाईट कम्प्युटरचे अभिजीत पाटील , हायटेक कम्प्युटरच्या सुरेखा पाटील, सिग्मा सेव्हन चे संदीप नेमाडे, रागिनी नेमाडे , एमटेक कम्प्युटरचे राजेंद्र पाटील, भावना पाटील युनिक कम्प्युटरचे स्वप्निल ठाकरे, यांनी मार्गदर्शन केले. रुपेश पाटील सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर प्रास्तविक करताना विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञानाची कास धरून आपले करिअर निवडावे व भवितव्य घडवावे असे मार्गदर्शन अतुल शिरसमणे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी धुळे येथील टीम तसेच श्री.गो.से.हायस्कुल, पाचोरा चे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377