एरंडोल येथे जिल्हास्तरीय राष्ट्रीय मतदार दिवसाचा कार्यक्रम

जळगाव,दि.२४ जानेवारी – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिनांक २५ जानेवारी २०२४ रोजी संपूर्ण जिल्हाभरात मतदान केंद्रावर, विधानसभा मतदार संघात व जिल्हास्तरावर राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येणार आहे.
त्याअनुषंगाने, यावर्षीचा जिल्हास्तरीय राष्ट्रीय मतदार दिवसाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी जळगांव व मतदार नोंदणी अधिकारी एरंडोल विधानसभा मतदार संघ यांच्या संयुक्त विदयमाने डी.डी.एस.पी. कॉलेज, एरंडोल येथे २५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता आयोजीत करण्यात आला आहे. अशी माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी दिली आहे.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



