आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्रशेती विषयक (FARMING)
Trending

पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सभापती गणेश पाटील व व्या.असो.अध्य. कल्पेश संघवी यांच्या हस्ते सपत्नीक रामललाची पूजा संपन्न

पाचोरा – दिनांक 22 जानेवारी रोजी संपूर्ण भारतात रामोत्सव साजरा करण्यात आला. पाचोरा या ठिकाणी देखील बाजार समिती येथील श्री दत्त मंदिर येथे माननीय सभापती गणेश पाटील व त्यांच्या सौ यांच्या हस्ते आरती करण्यात आली सोबत व्यापारी असोसिएशनचे कल्पेश संघवी व इतर संघटनेचे सदस्य तसेच बाजार समिती येथील कर्मचारी वृंद, सचिव बोरुडे व संबंधित विभागातील कर्मचारी यांनी या महाआरतीच्या वेळी आपला सहभाग नोंदवला.

मार्केट यार्ड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष कल्पेश संघवी सपत्नीक


देशात साजरा होत असणारा श्रीराम प्राणप्रतिष्ठा महोत्सवाचे पाचोरा येथील मार्केट यार्ड व्यापारी असोसिएशनच्या आयोजीत महाआरतीच्या कार्यक्रमास सदस्यांनी हजेरी लावून आपलाही सहभाग नोंदवला.

आरती साठी उपस्थित मान्यवर


सर्वप्रथम सभापती व इतर मान्यवरांच्या हस्ते यावेळी आरती होऊन व्यापारी व तेथील हमाल मापारी कर्मचारी सर्वांनी मिळून कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातून रॅली काढत आपल्या राम भक्तीचे परिचय करून दिला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनास सबंध देशवासीयांनी प्रतिसाद देऊन घरोघरी रांगोळी काढणे, गुढी उभारणे, दिवे लावणे, घरांवर रोषनाई ,करणे मंदिर परिसरात भजन, राम रक्षा स्तोत्र आदींचे पठण करून या ठिकाणी भक्तिमय वातावरण निर्माण केले, दिवाळी समक्ष वातावरण यावेळी सर्वत्र पहावयास मिळत होते.
याप्रसंगी आरतीनंतर डीजेच्या तालावर सभापती, सचिव सदस्य तसेच व्यापारी कर्मचारी हमाल वर्ग आदींनी नृत्य करीत आनंद साजरा केला.
सोहळ्यासाठी पाचोरा मार्केट यार्ड व्यापारी असोसिएशन यांनी महाआरती सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहनास प्रतिसाद देऊन सर्व व्यापारी बांधवांनी हजेरी लावली व एक जल्लोषमय रामभक्त असे वातावरण निर्मित करत ऐकोपाचा संदेश दिला.

सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृ.उ.बा.समितीतील जेष्ठ व्यापारी तसेच माजी उपसभापती श्री.सुभाष शेठ अग्रवाल,जेष्ठ व्यापारी प्रकाश शेठ पटवारी,भरत शेठ शेंडे,सचिन येवले,प्रतिक मोर,चेतन गौड,भुषण बोथरा,रुपेश बांठीया,सतिष चौधरी यासह आदीनी अथक परिश्रम घेतले..

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

बातमी लाईक  करा,शेअर करा

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!