मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांची धुळे येथे उपायुक्त पदी बदली झाल्याने त्यांचा निरोप समारंभ संपन्न
पाचोरा: नगरपरिषद येथील मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांची नुकतीच शासनाच्या आदेशानूसार धुळे उपायुक्त पदी बदली झाल्याने त्यांचा निरोप समारंभ आज नगरपरिषद अधिकारी / कर्मचारी यांच्या कडून आयोजीत करण्यात आलेला होता.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रभारी मुख्याधिकारी श्री.रविंद्र लांडे हे होते. 4 वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक विकासकामे केलीत. शहरातील बेशिस्त असलेल्या हातगाडयांना शिस्त लावण्याचे काम त्यांनी केले. मुख्याधिकारी बाविस्कर यांनी त्यांच्या मनेागत व्यक्त करतांना सांगीतले की, शहरातील स्वचछता, आरोग्य इ. कामे करण्यास मी प्राधान्य दिले. नगरपरिषदेच्या सर्व अधिकारी / कर्मचाऱ्यांनी कामात नेहमी सहकार्य केले त्याच प्रमाणे या शहराचा विकास करण्याकरीता रस्ते, खुल्या जागा, पथदिवे आदी विकास कामे करण्याकरीता मा.आमदार किशोर आप्पा पाटील, नगराध्यक्ष गोहील, सर्व पक्षीय नेते, प्रमुख पदाधिकारी यांनी देखील सहकार्य केले त्यामुळेच मी 4 वर्षाचा यशस्वी कार्यकाळ पुर्ण करु शकले. यावेळी कोवीड आजाराच्या पार्श्वभुमीवर केलेले काम सदैव स्मरणात राहील असे म्हणतांना त्या भावूक झालेल्या होत्या. अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना शब्दातून व्यक्त केल्यात मनोगत व्यक्त करतांना कर्मचारी भावून झाल्याचे दिसून आले.
सदर कार्यक्रमाकरीता प्रभारी मुख्याधिकारी श्री.रविंद्र लांडे, उपमुख्याधिकारी दुर्गेश सोनवणे, करनिरीक्षक दगडू मराठे, अंतर्गत लेखापरिक्षक नितीन लोखंडे, संगणक अभियंता भारती निकुंभ, पा.पू.अभियंता जितेद्र मोरे, आ.निरीक्षक विरेंद्र घारु, भांडारपाल प्रगती खडसे, अर्जुन भोळे, लिपीक ललित सोनार, विशाल दिक्षीत, विलास देवकर, प्रकाश पवार, प्रकाश गोसावी, विजेंद्र निकम, मनोज पाटील, राजेश कंडारे, नरेश आदिवाल, गोपाल लोहार, किशोर मराठे, विलास कुंभार, गणेश अहीरे आदी कर्मचारी उपस्थित होते.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377