सायकलपटू तरूणींची जिद्द व धाडसाला सलाम : वैशालीताई सुर्यवंशी सायक्लोथॉन रॅलीत सहभागी विद्यार्थीनींचे पाचोर्यात हृद्य स्वागत
पाचोरा, दिनांक १० : सायकलवरून जवळपास तब्बल २७५१ किलोमीटर अंतराच्या सायक्लोथॉन स्पर्धेत सहभागी होणे हे काम अतिशय जिकरीचे असतांनाही २१ तरूणी ज्या जिद्दीने व धाडसाने आगेकूच करताय हे अतिशय कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी केले. ते आज आयोजीत छोटेखानी स्वागत कार्यक्रमात बोलत होत्या.
सध्या गुवाहाटी ते मुंबई येथील गेटवे ऑफ इंडिया ही तब्बल २७५१ किलोमीटर अंतराची सायक्लोथॉन रॅली सुरू आहे. यात मूळचे पाचोरेकर असणारे संजय पाटील हे आपल्या २१ विद्यार्थीनींसह सहभागी झाले आहेत. त्यांचा चमू हा गुवाहाटीवरून निघून आज सकाळी पाचोरा शहरात पोहचला. या चमूचे शिवसेना-उबाठा पक्षाच्या मध्यवर्ती संपर्क कार्यालयात वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी स्वागत केले.
याप्रसंगी वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी संजय पाटील आणि त्यांच्या विद्यार्थीनींचे स्वागत केले. तर, यात सहभागी तरूणींच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. सायकलींग हे गरजेचे साधनच नसून तो एक महत्वाचा क्रीडा प्रकार देखील आहे. यातच २६ दिवसात सहा राज्ये पार करण्याची अट असणार्या सायक्लोथॉन सारख्या रॅलीत या यात सहभागी झालेल्यांची अगदी टोकाची परिक्षा घेणार्या असतात. मात्र या मुली मजल-दरमजल करत ज्या जिद्दीने आगेकूच करत आहेत ते खरोखरी प्रेरणादायी असल्याचे वैशालीताई सुर्यवंशी यांनी नमूद केले. या प्रसंगी पक्षाचे समस्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह परिसरातले गणमान्य नागरिक व सायक्लॉन रॅली प्रेमी उपस्थित होते.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377