जळगाव जिल्ह्यातील दिव्यांग क्रीडा स्पर्धा 2024 संपन्न व बॅटरीवर चालणारे तीन चाकी सायकल दिव्यांग लाभार्थ्यांना पाचोरा येथे वाटप .
पाचोरा – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय मुंबई दिव्यांग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद जळगाव व किशोर आप्पा बहुद्देशीय संस्था पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनाच्या औचित्य साधून जळगाव जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या विशेष शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांचा जिल्हास्तरीय दिव्यांची स्पर्धा सन 2024 – व समाज कल्याण विभागामार्फत सन 2023 24 या वित्तीय वर्षात स्वतंत्र दिव्यांग निधीतून 5 टक्के दिव्यांगाच्या कल्याणासाठी लाभार्थ्यांना स्वयंचलित सायकल वाटप. पाचोरा येथील एम एम कॉलेज तेथे संपन्न झाला.
जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धा 2024 या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी पाचोरा तालुक्याचे आमदार माननीय किशोर आप्पा पाटील यांनी पाचोरा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून उद्घाटन केले, यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पाचोरा तालुका श्री धनसिंग सुंदरडे साहेब , श्री भरत चौधरी समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद जळगाव व जळगाव जिल्ह्यातील सर्व दिव्यांग शाळा , तसेच पाचोरा नगरीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एम एम कॉलेज क्रीडांगण वर रॅलीचे आगमन झाल्यानंतर माननीय आमदार किशोर आप्पा पाटील पाचोरा कृषी उत्पन्न समिती सभापती श्री गणेश पाटील ,माजी नगराध्यक्ष संजय गोहिल , श्री जितु जैन पुनगाव गावचे सरपंच व युवा सेना तालुकाप्रमुख अनिल पाटील श्री भरत चौधरी जिल्हा समाज कल्याण विभाग जळगाव मीनाक्षीताई निकम स्वयमदीप दिव्यांग बहुउद्देशीय चाळीसगाव मुकुंदा गोसावी ,गणेश पाटील. ए.के महाले. विजय सुरवाडे ,दिव्यांग विद्यार्थ्यांनी मान्यवरांचे स्वागत केले. मा. भरत चौधरी जिल्हा समाज कल्याण अधिकारी विभाग जिल्हा परिषद जळगाव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले मीनाक्षीताई निकम चाळीसगाव यांनी आपले मनोगत व्यक्त केले व माननीय आमदार किशोर आप्पा पाटील यांनी मार्गदर्शन करून आपले मनोगत व्यक्त केले. जिल्हा समाज कल्याण विभागाच्या वतीने दिव्यांगांच्या कल्याणाकरीता जिल्हा परिषद 5% सेस फंडातून स्वयंचलित बॅटरीवर चालणाऱ्या तीन चाकी सायकल ,पूजा कोळी.लोहारा ,रफिक करीम लोहटार ,धनराज विक्रम पाटील तारखेडा चरणसिंग राठोड रामेश्वर तांडा या दिव्यांग लाभार्थ्यांना माननीय आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते दिव्यांग लाभार्थ्यांना बॅटरीवर चालणारे सायकल वाटप करण्यात आली.मा. श्री.भरत चौधरी जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी विभाग जिल्हा परिषद जळगाव , श्री. आबासाहेब महाले दिव्यांग कक्ष अधिकारी, श्री.विजय सुरवाडे पंचायत समिती पाचोरा. मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377