पाचोरा शहरात समता सैनिक दला तर्फे 13मार्च रोजी बाईक रॅलीचे आयोजन

पाचोरा, दि 12 – देशात व राज्यात १३ मार्च रोजी समता सैनिक दलाचे वर्धापान दिन उत्साहाने साजरी केले जाते.
याच पार्श्वभूमीवर आपल्या पाचोरा शहरात देखील स.सै.दलाचे राज्य अध्यक्ष आयु.नानासाहेब बागुल यांच्या सूचनेनुसार दलाचे ९७ व्य वर्धपान दिनी भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर रॅालीचे मुख्य नेतृत्व समता सैनिक दलाचे जिल्हा अध्यक्ष आयु.किशोर डोंगरे आसून आयोजक समता सैनिक दल पाचोरा व भडगाव तालुका व दोन्ही शहरातील पदाधिकारी व कार्यकारणी आहे.
समता सैनिक दलाची हि पहिली बाईक रॅली आसुन सदर रॅलीत तालुक्यातील व शहरातील जास्तीत जास्त समाज बांधव व दलाचे सैनिक सहभागी होणार आहेत.अशी माहिती समता सैनिक दलाचे पाचोरा तालुका अध्यक्ष आयु.शांताराम सपकाळे व भडगावचे तालुका अध्यक्ष आयु.विजय मोरे यांनी दिली आहे.
रॅलीची रूपरेषा :- १३ मार्च २०२४ रोजी सकाळी ठिक ११ वाजता जांरगाव चैफुली पासून ते पाचोरा शहर व समारोप डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ जिल्हा अध्यक्ष आयु.किशोर डोंगरे हे मार्गदर्शन पर कॅार्नर सभा घेवून होणार आहे.
अशी माहिती जिल्हा सहसचिव आयु.पिंटू सावळे व जिल्हा संघटक अरूण खरे यांनी दिली आहे.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



