
पाचोरा,( पिंपळगाव हरे) दि २० – येथील गावात १९ जून रोजी रात्रीच्या सुमारास २६ वर्षीय महिला आपल्या घरात झोपलेली असताना तिकडील राहणारा संशयीत आरोपी परशुराम मधुकर पवार हा वाईट हेतूने घरात घुसून महिला झोपलेली असताना विनयभंग केल्याचा प्रकार घडला. त्या महिलेच्या तक्रारीवरून सदर घटनेचा पिंपळगाव हरे. पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पो.स्टे ला अधिक अधिक माहिती जाणुन घेतली असता आरोपी मिळून न आल्याने पुढील तपास सुरु असून,तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक पांडुरंग गोरबंजार करीत आहे.
पिंपळगाव(हरे) पो.स्टे हद्द परिसरात सदर घटनेने खळबळ निर्माण झाली असून मागील दोन ते तिन महिन्यात अशा घटना वारंवार होत असून भितियुक्त वातावरण पसरलेले असल्याची भावना तेथील नागरिकांन मध्ये जाणविली.तसेच कायद्याचा वचक येथील परिसरात आहे की नाही अशी शंका निर्माण होताना या घटनांन वरुण दिसून येते
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



