पाचोरा कृषि उत्पन्न बाजार समितीचा नगरदेवळा येथील गुरांचा बाजार पुन्हा जोमाने सुरु करणार – सभापती गणेश पाटील

पाचोरा कृषि उत्पन्न बाजार समितीचा नगरदेवळा येथील गुरांचा बाजार पुन्हा जोमाने सुरु करणार – सभापती गणेश पाटील
पाचोरा – कोरोना काळात कमी झालेला व्यापार पूर्ववत सुरु व्हावा यासाठी कृषि उत्पन्न बाजार समिती, पाचोरा उपबाजार नगरदेवळा येथे दर सोमवारी भरणारा गुरांचा बाजारात परिसरातील गुरे खरेदी – विक्रीसाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी नवनिर्वाचित सभापती गणेश पाटील, उपसभापती प्रकाश पाटील यांच्यासह नवनिर्वाचित संचालक मंडळ यांनी आमदार किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य नियोजन करून बाजार समितीच्या परिसरातील गुरांच्या व्यापाऱ्यांचे व्यवसाय वाढीच्या दृष्टीने तेथे नवीन सोई सुविधा उपलब्ध करून त्याअनुषंगाने नवीन सोईसुविधा युक्त नगरदेवळा येथील गुरांचा बाजार १० जुलै २०२३ पासून दर सोमवारी सुरु करण्यात येत आहे. तरी परिसरातील सर्व गुरे – ढोरे खरेदी विक्री करणारे शेतकरी, व्यापारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सहकार्य करावे. असे प्रतिपादन बाजार समितीचे सभापती यांनी केले. यावेळी सभापती, उपसभापती, सर्व संचालक मंडळ, सचिव उपस्थित होते.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



