
पाचोरा- पाचोरा पिपल्स को-ऑपरेटिव बँक ली ही व्यापाऱ्यांची बँक, शेतकऱ्यांची बँक तसेच गोरगरीब श्रीमंत अशा सर्व स्तरातील लोकांची बँक म्हणून नाव लौकिकास होती परंतु आता येथील बँकेमध्ये बघता काहीतरी अभाव जाणवत असल्याचे दिसते पाचोरा पीपल बँकेने आपल्या ग्राहकांसाठी व नागरिकांसाठी एटीएम सुविधा तसेच कॅश डिपॉझिट सिस्टम हे सुद्धा कार्यान्वयीत केली होती परंतु येथे नेहमीचा असा अनुभव येत असतो की जे एटीएम बसविलेले आहे ते बराच काळ बंद असते एकतर मशीन मध्ये खराबी असल्याच्या कारणाने किंवा येथील एसी संच बंद असणे व जरी तो नवीन घेतलेला असला तरी लवकर खराब का झाला आणि तो खराब झाल्यामुळे मशीनलाही प्रॉब्लेम आला असावा तसेच खराब झालेला एसी दुरुस्त का झाला नाही शिवाय ज्या व्यक्तीकडून घेतलेला आहे असे संबंधित दुकानदार व्यक्ती विकलेल्या मालाची सेवापूर्ती का करू शकत नाही असा गहन प्रश्न येथे उपस्थित होतो.
परंतु एकीकडे आपण सर्विस देत असल्याचा गाजावाजा करायचा आणि दुसरीकडे एटीएमची सुविधा न मिळाल्याने त्रस्त झालेला नागरिक , ग्राहक हा अशी त्रेधा तिरपीट उडवणारी सेवा देणाऱ्या एटीएम व तत्सम मशिनरीला कंटाळलेला असून सदर बँकेने आपल्या नावलौकिकास साजेल असं वागणे अपेक्षित आहे तरी वारंवार बंद पडणारे एटीएम मशीन पुन्हा सुस्थितीत आणून ग्राहकांना एटीएम सेवेचा लाभ मिळू द्यावा यासाठी अनेक लोक अपेक्षा व्यक्त करताना दिसतात.
संबंधित बँकेचे सीईओ काळे सर व व्यवस्थापक अथवा पीआरओ यांच्याकडे स्वतः याबाबत तोंडी तक्रार केलेली होती परंतु तरीही मागच्या चार ते पाच दिवसात अशीच अवस्था बंद असलेल्या या एटीएम मुळे बघावयास मिळते तरी सदर मशिनरी चालू ठेवणे कामी बँकेने एटीएम सेवा पुरविणाऱ्या कंपनीकडून लवकरात लवकर नादुरुस्त असलेल्या वस्तू अथवा येथील एसी संच व इतर उपकरणे, पार्ट हे रिपेअर करून नागरिकांना एटीएम सुविधेचा चा लाभ द्यावा एवढीच रास्ता अपेक्षा येथे येणाऱ्या नागरिकांची ग्राहकांची असते व एसी संच रिपेअर न करून देणाऱ्या व सर्विस न देणाऱ्या त्या संबंधित दुकानदाराला यापुढे काम न देता स्थानिक दुकानदारांना प्राधान्य द्यावे व “आपली बँक आपल्या माणसांसाठी” असे ब्रीदवाक्य असावे का,अशी रास्त अपेक्षा व्यक्त केली जात असल्याचेही चित्र पाहावयास मिळते.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



