जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये 9 ऑगस्टला सामूहिक राष्ट्रगीत

जळगाव,दि.5 – “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अंतर्गत दि. 9 ऑगस्ट 2022 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत “स्वराज्य महोत्सव” उपक्रम राबविणेबाबत शासनाचे निर्देश असून त्याचाच एक भाग म्हणून जिल्हयातील सर्व शाळा/विद्यापीठ व महाविद्यालय / शैक्षणिक संस्था यामधून दिनांक 9 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता एकाच वेळी राष्ट्रगीत गायन होईल. जिल्हयातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यामध्ये सामील होतील, तसेच जिल्ह्यातील नागरिकांनाही यावेळी ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी उभे राहून राष्ट्रगीत गायनात सहभागी होण्याचे आवाहन करणेत येत आहे. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377



