निवडणुकीच्या कामाप्रती अशीही निष्ठा …. !!
जळगाव – दि.१२ एकीकडे निवडणुकीच्या कामाला विविध कारणे सांगून नको म्हणणाऱ्यांची संख्या कमी नसताना निवडणुकीच्या कर्तव्याला जागून आईच्या शस्त्रक्रियेला बगल देत कर्तव्य सर्वश्रेष्ठ मानणारे अधिकारी जळगाव जिल्ह्यात असल्याचे उदाहरण जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी दाखवून दिले आहे.
जळगाव जिल्ह्यात सध्या तीव्र उन्हाळा सुरु आहे अशातच आज दि. १३ मे रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. ऐन उन्हाळ्यात मतदान आल्याने आणि त्यातच मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न प्रशासन करीत असल्याने मतदान केंद्रावर मतदारांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे गरजेचे होते. प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य केंद्र उभारण्याची जबाबदारी जिल्हा आरोग्य यंत्रणेचे प्रमुख म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांचेवर सोपविण्यात आली . त्या दृष्टीने सर्व नियोजन देखील त्यांनी केले. याच दरम्यान त्यांच्या ६७ वर्षीय आई सौ .शोभा भायेकर , रा. पूर्णा जि . परभणी यांचे पायाचे दुखणे बळावले . डॉक्टरांनी गुढग्याचे प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. शस्त्रक्रियेची तारीख देखील ठरली. ठरल्या तारखेप्रमाणे ११ मे रोजी हि शस्त्रक्रिया होणार होती. डॉ. भायेकर स्वतः डॉक्टर असल्याने त्यांना या दुखण्याचे गांभीर्य होतेच . मात्र एकीकडे आईची न टाळता येणारी शत्रक्रिया तर दुसरीकडे लोकशाहीचा सर्वात मोठ्या उत्सवात आपल्यावर असलेली जबाबदारी या दोन्ही गोष्टी डोळ्यासमोर होत्या. सर्व मतदान केंद्रावर आरोग्य सुविधा कार्यान्वित करायच्या होत्या. मतदानाच्या ठिकाणी गरोदर माता ,स्तनदा माता रक्तदाब ,मधुमेह ,कर्करोग ,क्षयरोग या आजाराचा त्रास असलेल्या मतदारांना मतदान केंद्रावर ऊन होण्याच्या आत मतदानासाठी बाहेर पडण्यास प्रोत्साहित करायची जबाबदारी देखील स्वस्थ बसू देत नव्हती . मात्र अश्या कठीण प्रसंगात देखील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भायेकर यांनी कर्तव्याला प्रथम प्राधान्य देत आईची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याची जोखीम घेत . नांदेड च्या डॉक्टरांशी सल्ला मसलत करून ठरलेली ११ तारखेची शस्त्रक्रिया पुढे ढकलत कर्तव्या प्रति असलेला प्रामाणिक पणा सिद्ध केल्याने जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांनी डॉ. भायेकर यांच्या त्या कृतीचे कौतुक केले आहे. जळगाव जिल्हा प्रशासनात असे कर्तव्याला महत्व देणारे प्रामाणिक अधिकारी असल्यानेच निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडणार असल्याचा विश्वास या निमित्ताने व्यक्त होत आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377