जळगाव,दि ११ – 13 मे 2024 च्या जळगाव लोकसभा निवडणुकीत उबाठा-महाविकास आघाडी तर्फे उमेदवार म्हणून पारोळ्याचे मा.नगरअध्यक्ष करण पवार हे निवडणूक लढवीत आहे महाविकास आघाडीचा भला मोठा सपोर्ट त्यांना असला तरी जळगाव लोकसभा निवडणूक वाटते तितकी सोपी नाही.
मा.खा. उन्मेषदादा.पाटील यांचे तिकीट कापल्या गेल्याने ते उबाठा पक्षामध्ये सामील झाले आणि त्यांच्या सोबत पारोळ्याचे करण पवार यांनाही लोकसभेचे उमेदवारी मिळून देण्यात यशस्वी होऊन निवडणुकीस सामोरे जात आहे. ज्याप्रमाणे विद्यमान खासदार यांचे तिकीट कापले गेले त्यामुळे मा.खा.उन्मेष पाटील नाराज होऊन कारणीभूत असलेल्या भाजपातील नेत्याला व त्यांच्या जवळील आमदारास दोषी ठरवत चंगू–मंगु अशी जोडगोळी ची उपमा देत अनेक सभांमधून उन्मेष पाटील जोरदार बॅटिंग करीत आहे आणि आपल्यावर विश्वास ठेवून पक्षांतर केलेल्या उमेदवार करण पवार यांना ते साथ देत आहे.
करण पवार हे देखील मात्तबर घराण्यातील राजकीय वारसा असेलेले उमेदवार असल्याने त्यांचाही राजकारणातील गाढा अभ्यास आहे शिवाय मतदारसंघात प्रत्येक तालुक्यात असंख्य नातेवाईक आहे त्यामुळे त्यांना ही निवडणूक जड जाईल असे काही चित्र दिसत नाही शिवाय त्यांचा मित्रपरिवार मतदार संघांमध्ये मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तोदेखील छुप्या पद्धतीने अथवा उघड उघड सोशल मीडिया असो किंबहुना वैयक्तिक स्तरावर प्रचार करताना दिसत आहे त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी नक्की होणार नसून चुरशीची होईल यात काही शंका नाही तरुणांमधून त्यांना मिळत असलेला प्रतिसाद हा देखील जमेची बाजू ठरू शकतो शेतकऱ्यांचे प्रश्न ,युवकांना रोजगार, महिलांना रोजगार व महिला सबलीकरण, मतदासंघांत उद्योग वाढीतून विकास आदी ध्येय धोरणे राबविण्याचा मानस घेऊन ते लोकसभा निवडणुकीत जनतेसमोर जात आहे शिवाय केंद्र आणि राज्य सरकार बाबत सद्य स्थितीतील राजकिय परिस्थितीची जनतेमध्ये निर्माण झालेली संभ्रमावस्था , महागाई , शेतीमालास माफक भाव न मिळणे , बेरोजगारी, वाढती गुन्हेगारी,उद्योग व्यवसायातील छोट्या मोठ्या व्यापऱ्यांच्या टॅक्स संदर्भातील अडचणी अशा अनेक मुद्द्याना प्रभावी पणे जनते समोर मांडत ते आपली भूमिका स्पष्ट करीत मतदारांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करून सोबतीला असलेले सर्व छोटे मोठे आघाडीतील घटक पक्ष,मित्र परिवार यांना उचित सन्मान देऊन,विजयाच्या आत्मविश्वासाने वाटचाल करताना वरिष्ट स्तरावरील नेत्यांचे मार्गदर्शन,रणनीती आखून या निवडणुकीच्या द्वंद्वाचे शिल्पकार मा.खा.उन्मेषदादा पाटील यांच्यासोबत जळगाव लोकसभेचा किल्ला सर करण्यासाठी पुढे वाटचाल करीत आहे परंतु सुर्याजी पिसाळांची कमीही आताच्या आधुनिक युगात नाही ही बाब समयसूचकतेने हेरणेही आवश्यक ठरते
त्यांना अर्धांगिनी अंजलीताई करण पवार यांची मिळत असलेली साथ देखील येथे संदर्भित करने गरजेचे वाटते.जळगाव लोकसभा मतदार संघामधील महिला मतदारांपर्यंत पोहचून विजयश्री खेचून आण्यासाठी रनरनत्या उन्हात त्या महिला पदाधिकारी व कार्यकर्तेसह आघाडीतील मित्रपक्षा सोबत संपूर्ण मतदार संघ पिंजून काढीत आहे व खांद्याला खांदा लावून नारी शक्तीची प्रचिती करून देत आहे.
भाजपा मधील तिकीट न मिळालेले नाराज असल्याचे जरी बोलले जात असले किंवा मा.खा.उन्मेषदादा पाटीलयांचे सोबत गेलेले कार्यकर्ते,अंतर्गत असलेली वर्चस्वाची स्पर्धा अशी जनसामान्यांन असलेली चर्चा या गोष्टींचाही काही प्रभाव पडेल की नाही याची अनिश्चितता,मतदानाचे घटते प्रमाण,तसेच पाचोरा येथील सभे वेळी आलेले उपमुख्यमंत्री भाजपा ता.अध्य.अमोल शिंदे यांचे घरी न गेल्यामुळे वृत वाहिनीवर आलेल्या बातमिने निर्माण झालेला संशय कल्लोळ आदि घटना याचा किती अंशी या लोकसभा निवडणुकीत परिणाम होतो हे वास्तव्य निकालांतीच कळेल
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377