जिल्हा निवडणूक प्रशासनाचे मतदानाच्या दोन तास अगोदर पर्यंत जनजागृतीचे प्रयत्न; प्रयत्नाला मतदारांची सकारात्मक साद
जळगाव दि.13 – जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून मतदान जागृती करतांना अनेक अभिनव कार्यक्रम घेतले. मतदाना दिवशी सकाळी मतदान सुरु होण्यापूर्वी, दुपारी, संध्याकाळी आवाहनाचे व्हिडीओ व्हायरल केले. त्याला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन अनेकांनी स्टेटसही ठेवले.
सकाळी 6.30 वाजता पहिला व्हिडीओ संपूर्ण जळगाव जिल्ह्यात वायरल करण्यात आला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी हातात कप घेवून, “दादा, भाऊ, आजी तुम्ही सर्वांनी चहा घेतलाच असेल, मतदान सुरु होतंय, चला लवकर.. मतदान करू या ” असा दहा सेंकदाचा व्हिडीओ होता, तो अत्यंत परिणाम कारक ठरला. दुपारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांचा जनतेला आवाहन करणारा व्हिडीओ व्हायरल केला. त्यानंतर जळगाव महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी भगत यांच्या आवाहनाचा व्हिडीओ व्हायरल केला… संध्याकाळी पुन्हा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला त्यात संध्याकाळचा चहा झाला असेल, मतदान केंद्रावर 6 वाजे पर्यंत मतदान सुरु आहे, लवकर जा, मतदान करा.. यात अनेकांनी मतदानाला निघतो आहोत असे संदेश पण दिले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377