पाचोरा येथे खेळी मेळीच्या वातावरणात पार पडली लोकसभा निवडणुक
आ.किशोरआप्पा पाटील, मार्केट सभापती गणेश पाटील, हरून देशमुख, ,दत्ता पाटील,रणजित पाटील सर यांचे सह विविध पक्षांचे पदाधिकारी
पाचोरा,दि.13 – लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले सर्व पक्षीय राजकारणी प्रचारा दरम्यान आप आपल्याला पक्षाचा व आघाडीचा प्रचार करताना दिसत होते तसेच आपले मुद्दे जनतेला पटवून देण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करीत होते एकमेकावर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडत होते. आपल्या पक्षाचे ध्येय धोरणे विकास कामे पटवून देण्यासाठी सत्ताधारी पक्ष सर्वतोपरी प्रयत्न करीत होते तर दुसऱ्या बाजूला विरोधक केलेल्या कामांवर टीका टिप्पणी करत जनतेची दिशाभूल करणारे व नागरिकांना भूल थापा देणारे सरकार असल्याचे पटवून देण्याचा प्रयत्न करताना दिसत होते.असे असतानाही निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी मतदारांची वोटिंग साठी लगबग सुरू असताना मिळालेल्या निवांत क्षणी सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते एकाच ठिकाणी बसून चर्चा विनिमय किंबहुना निवांत क्षणी घेतलेल्या अल्प अवधीच्या ब्रेकदरम्यान हास्य कल्लोळ करताना दिसत होते.
राजकारण,निवडणुका, वर्चस्वाची लढाई आदि गोष्टी जरी या नित्याने राजकारणात होत असल्या तरी सर्वांशी व्यक्तिगत असलेले नातेही जोपासावे लागते त्यामुळे नात्यांमधील गोडवाही जोपासला जातो यात काही शंका नाही,मात्र जनतेच्या मनात याची काय भावना पोहचत असेल हे ही कोडं निश्चित सुटणारे असेल असे ही नाही.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377