पाचोरा – शहरातील जारगाव चौफुलीवर जळगाव कडे जाताना ट्रक आणि मोटरबाईक अपघातात पती समोर पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे यात ट्रक चालका विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या बाबत माहिती अशी की शेख इस्माईल अब्दुलनबी मणियार रा. गिरड ता. भडगाव हे आपली पत्नी सना शेख इस्माईल मणियार (वय – २६ वर्ष) यांची प्रकृती खराब असल्याने त्यांना पाचोऱ्यातील जारगाव चौफुली खाजगी रुग्णालयात प्रकृती दाखविण्यासाठी १५ मे रोजी सकाळी मोटरसायकलवरून निघाले होते. दरम्यान जारगाव येथील बेशीस्त वाहतुक व वाढते अतिक्रमण यामुळे शेख इस्माईल मणियार हे आपली मोटरसायकल चालवित असताना रस्त्यावर एक ट्रक रिव्हर्स येत असताना त्याच्या चाकाखाली सना शेख इस्माईल मणियार ह्या सापडुन त्यांचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला. तर शेख इस्माईल मणियार यांचेसह त्यांच्या आई शानुरबी अब्दुलनबी मणियार व ४ वर्षीय महिरा शेख इस्माईल मणियार हे गंभीर जखमी जखमी झाले आहेत. त्यांचेवर पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच काॅंग्रेसचे पाचोरा तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, इरफान मणियार, लतीफ शेख राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे अझर खान, हे घटनास्थळी दाखल होवून त्यांनी मयत सना शेख इस्माईल मणियार व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377