पाचोरा– येथील श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पाचोरा येथे दिनांक 6 जून 2024 रोजी महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा 351 वा शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी पाचोरा भडगाव मतदारसंघाचे माजी आमदार तथा पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.भाऊसाहेब दिलीप वाघ यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवराज्याभिषेक प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ व्हा.चेअरमन नानासाहेब व्ही टी जोशी संस्थेचे संचालक डॉ.जयंतराव पाटील वासूअण्णा महाजन, डॉ.बी.एन पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिरीष पाटील उपप्राचार्य डॉ.वासुदेव वले उपप्राचार्य डॉ.जे व्ही पाटील उपप्राचार्य प्रा.जी बी पाटील प्रा.एस एस पाटील श्री नितीन पाटील श्री ऋषिकेश ठाकूर महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आदी सर्व उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ अतुल सूर्यवंशी यांनी केले तर आभार डॉ माणिक पाटील यांनी मानले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377