आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र

पाचोऱ्यात श्री गो से स्कूल पाचोरा मधील माजी विद्यार्थ्यांचा दोस्त माझे मस्त हा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

पाचोरा – श्री गो से हायस्कूल पाचोरा येथील सन 1996/ 1997 या शैक्षणिक वर्षांमधील इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा दोस्त माझे मस्त हा स्नेह मेळावा दैवयोग मंगल कार्यालयात उत्साहात संपन्न झाला या स्नेह मेळाव्या साठी मुंबई पुणे नाशिक तारापूर नागपूर जळगाव चाळीसगाव धुळे नंदुरबार पाचोरा येथील 90 माजी विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला 27 वर्षांनी एकत्र आल्यानंतर त्यांनी सुरुवातीला एकमेकांची गळा भेट हस्तांदोलन करून शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला शहरातील किरण शिंपी दत्ता सोनार गोकुळ सोनार यांनी 160 माजी विद्यार्थी विद्यार्थिनींचा व्हाट्सअप ग्रुप तयार करून या ग्रुपच्या माध्यमातून संपर्क साधून त्यांनी दोस्त माझे मस्त या स्नेह मेळाव्याचे आयोजन केले सकाळी साडेनऊ वाजता चहापान नाश्ता केल्यानंतर सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांना शिकवत असलेल्या सर्व सेवानिवृत्त शिक्षक शिक्षक बंधू-भगिनीं यांनी श्री गो से हायस्कूल पाचोरा या शाळेला भेट दिली शाळेच्या मुख्याध्यापिका सौ प्रमिला वाघ पर्यवेक्षक आर एल पाटील एबी अहिरे यांनी सेवानिवृत्त शिक्षक बंधू-भगिनींची सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले तेथे माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपण कोणत्या वर्गात शिकत होतो मोठ्या अभ्यास करायचा कुठे खेळत होतो खोड्या कशा करत होतो कुठे गप्पा मारत होतो कोणत्या बेंचवर बसत होतो या सर्व मागील आठवणींना उजाळा दिला कार्यक्रमाची सुरुवात अपेक्षा पवार यांच्या इतनी शक्ती हमे देना दाता या स्वागत गीताने करण्यात आली कोरोना काळात त्यांचे मयत झालेले सहकारी मित्र त्यांना शिकवत असलेले शिक्षक यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर त्यांना शिकवत असलेल्या सर्व सेवानिवृत्त शिक्षक बंधू-भगिनींचा 1997 च्या बॅचच्या विद्यार्थ्यां विद्यार्थिनींनी शाल श्रीफळ देऊन सत्कार व स्वागत केले सर्व उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपला परिचय करून दिला आणि त्यांनी शिक्षकां च्या प्रति आदर युक्त भावना व्यक्त केल्या शिक्षक बंधू-भगिनींनी विद्यार्थ्यांना यथोचित मार्गदर्शन करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या व्यासपीठावर शाळेच्या मुख्याध्यापिका प्रमिला वाघ कुमारी सुधा जोशी गणपत वाणी शांताराम चौधरी भास्कर बोरुडे राजेंद्र पाटील ए जे महाजन बीपी बडगे प्रताप सूर्यवंशी बीपी वाणी अजय अहिरे विश्वास साळुंखे सुधीर पाटील उपस्थित होते या सर्वांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार व्यक्त करून शुभेच्छा दिल्या स्नेह मेळाव्यासाठी अमोल ठाकूर दत्ता सोनार गोकुळ सोनार अभिलाष बोरकर नितीन पाटील विनोद मार्तंडे दीपक माने हेमंत सोनार जितेंद्र भावसार शरद मिस्त्री सचिन कानडे ललित बडगे संदीप सिसोदिया महेश सोमवंशी अमित पाटील अपेक्षा पवार पल्लवी देशपांडे कांचन तांबोळी सुवर्णा चौधरी जयश्री ठाकूर किरण सोनार वैभव जोशी समाधान जोशी बापू पाटील आत्माराम महाजन अल्पेश कुमावत किरण कुमावत बापू पाटील प्रवीण चौधरी गोपाल पाटील उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोनार सूत्रसंचालन माधुरी ठाकूर आभार अभिलाष बोरकर यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी 1997 च्या दहावीच्या बॅचमधील माजी विद्यार्थी विद्यार्थिनी परिश्रम घेतले

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

बातमी लाईक  करा,शेअर करा

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!