धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी निवासी शाळेत प्रवेशासाठी 14 जून रोजी लकी ड्रॉ
जळगाव, दि.१३ :- धनगर समाजाच्या (भटक्या जमाती-क) विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये पहिली व पाचवीच्या वर्गात प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता शासन निर्णयान्वये बियाणी पब्लिक स्कुल भुसावळ व हॅरीसन पब्लिक स्कूल चाळीसगाव या शाळेची निवड करण्यात आलेली आहे. सदर योजने अंतर्गत सन २०२४ व २ ५ या शैक्षणिक वर्षामध्ये प्रवेशासाठी जळगाव जिल्हयातील इच्छुक असणाऱ्या विदयार्थ्याच्या पालकांकडून दिनांक १ एप्रिल २०२४ ते १२ जून २०१४ पर्यंत अर्ज मागविण्यात आलेले आहेत. सदर प्राप्त अर्जामधून विदयार्थ्यांचा प्रवेश निश्चित करण्यासाठी दिनांक १४ जून, २०२४ रोजी सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आबेडकर, सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदिरासमोर, महाबळ रोड जळगाव येथे लकी ड्रॉ ( लॉटरी) आयोजन करण्यात आलेले आहे. तरी विदयार्थ्यांच्या पालकांनी लकी ड्रॉ ( लॉटरी) आयोजन वेळी उपस्थित राहावे असे आवाहन सहाय्यक संचालक मागास बहुजन कल्याण जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377