डॉ. पंजाबराव देशमुख कृषि संजीवनी पंधरवडयामध्ये सहभागी होण्यासाठी शेतकरी बांधवांना आवाहन
जळगाव दि. १८ :- महाराष्ट्र राज्यात १७ जून २०२४ ते १ जुलै, २०२४ या कालावधीत डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२५ व्या जयंती निमित्ताने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी संजीवनी पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. या पंधरवडयामध्ये प्रत्येक दिवशी विशिष्ट मुदयांवर शेतकरी बांधवामध्ये कृषि विभागाच्या विविध घटकाविायी जनजागृती करण्यात येणार आहे. या पंधरवडयाची सांगता दिनांक १ जुलै, २०२४ रोजी मा. स्व. वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनी कृषि दिन म्हणून साजरा करुन करण्यात येणार आहे. या पंधरवाडयामध्ये राज्यामध्ये एकाच दिवशी एकाच मोहिमेची प्रचार व प्रसिध्दी करण्यात येणार आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या पंधरवाडयामध्ये सहभाग घ्यावा. दि. १७ जुन, २०२४ ते १ जुलै, २०२४ या कालावधीत प्रत्येक दिवशी खालीलप्रमाणे महत्वाच्या मोहिमांवर विशेष भर देऊन डॉ. पंजाबराव देशमुख कृषि संजीवनी पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. दिनांक – १७ जुन, २०२४ बीजप्रक्रीया जनजागृती दिन, १८ जून, २०२४ पी.एम.किसान उत्सव दिवस, १९ जुन २०२४ जमिन सुपीकता जागृती दिन, २० जुन, २०२४ गुणवत्तापूर्ण निविष्ठांची ओळख दिन, २१ जुन, २०२४ महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत फळबाग लागवड व तंत्रज्ञान प्रसार,२२ जुन, २०२४ पिक विमा जनजागृती दिन, २३ जुन, २०२४ हवामान अनुकुल शेती तंत्रज्ञान प्रसार दिन२४ जुन, २०२४, सोयाबीन व मका लागवड तंत्रज्ञान दिन, २५ जुन, २०२४ कापुस भात व ऊस लागवड तंत्रज्ञान दिन, २६ जुन, २०२४ तुर व इतर कडधान्य लागवड तंत्रज्ञान दिन, २७ जुन २०२४ कृषि महिला शेतकरी सन्मान दिन, २८ जुन, २०२४ जिल्हयातील महत्वाच्या पिकांची कीड व रोग नियत्रणाच्या उपाययोजना, २९ जुन , २०२४ शेतकरी मासिक वाचन दीन व वर्गणीदार वाढविणे, ३० जुन, २०१४ प्रगतीशील शेतकरी संवाद दिन, १ जुलै, २०२४ कृषि दिन
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377