शिष्यवृत्ती परीक्षेत श्री. गो.से. हायस्कूलचे घवघवीत यश.

पाचोरा – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा येथील इ. 8 वी च्या खुषी मनोहर सोनवणे, हर्षल शैलेंद्र चौधरी, दिगेश दीपक सोनार, हीतेश शांताराम चौधरी या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष प्राविण्यासह गुणवत्ता यादीत स्थान मिळवले.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.पी.एम.वाघ मॅडम यांच्या हस्ते वरील गुणवंत विद्यार्थ्यांचा स्वागत व सत्कार करण्यात आला. सौ.वाघ मॅडम यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी शाळेचे पर्यवेक्षक श्री.आर.एल.पाटील सर,श्री. ए.बी.अहिरे सर, श्री. अनिल पाटील सर व इतर शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



