आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र

मतदारसंघातील एकही महिला लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहणार नाही यासाठी कटिबद्धआ.किशोर अप्पा पाटील यांची ग्वाही

पाचोऱ्यात लाडकी बहीण योजनेच्या मार्गदर्शन मेळाव्याला महिलांची तुफान गर्दी

पाचोरा – महाराष्ट्र शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभा पासून मतदार संघातील एकही माता भगिनी वंचित राहणार नाही यासाठी प्रशासनानाच्या साथीने आमदार म्हणून मी स्वतः व संपूर्ण शिवसेना पक्ष लोकप्रतिनिधी व पदाधिकारी आम्ही कटिबद्ध असून तळागाळातील बहिणींना न्याय देण्यासाठी शिवसेनेने कायमच पुढाकार घेतला असल्याची ग्वाही आमदार किशोर अप्पा पाटील यांनी दिली ते शहरातील सारोळा रोड वरील समर्थ लान्स येथे महिला सक्षमीकरण मेळाव्यात लाडकी बहीण योजनेबद्दल आयोजित मार्गदर्शन शिबिरात बोलत होते.यावेळी उपस्थित सुमारे पाच हजार महिलांनी दोघे हाथ उंचावत शासनाच्या आभार व अभिनंदनाचा ठराव केला. मतदारसंघातील सर्व जिल्हा परिषद गटनिहाय जनसुविधा कार्यालालय सोमवार पासून सुरू कार्यान्वित करणार असून त्या जनसुविधा कार्यालयातून लाडकी बहीण योजनेचे काम आमचे पदाधिकारी करतील अशी महिती यावेळी आ. किशोर अप्पा पाटील यांनी दिली.दरम्यान कोणीही या योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशांची मागणी केल्यास थेट आपल्या कडे तक्रार करा असे आवाहनही त्यांनी उपस्थित महिलांना केले.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुतीच्या शासनाने महिलांसाठी एस टी प्रवासातील सूट, अंगणवाडी सेविका,आशा वर्कर,पोलीस पाटील आदींच्या मानधनात केलेली भरघोस वाढ यासह संजय गांधी योजनेतील पात्र लाभार्थ्यांना देखील लाभाची रक्कम वाढवून देत खऱ्या अर्थाने योजनांचा लाभ देऊन न्याय्य भूमिका घेतली आहे. शेतकरी,युवक,महिला, कामगार आदी घटकांच्या प्रगतीसाठी शासन काम करत असल्याची देखील माहिती त्यांनी यावेळी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंजली चव्हाण यांनी केले यावेळी प्रांताधिकारी भूषण अहिरे यांनी मनोगत व्यक्त केले तर गटविकास अधिकारी डॉ स्नेहल शेलार यांनी लाडकी बहीण योजनेबद्दलची सविस्तर माहिती उपस्थित महिलांना दिली तसेच मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी शहरी भागातील बचत गटाच्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, प्रदीप देसले यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी मंचावर उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, उपसभापती पी ए पाटील,उपजिल्हा प्रमुख किशोर बारावकर, युवा नेता सुमीत पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल,पंचायत समितीचे माजी सभापती अनिल पाटील, माजी प.स.सदस्य पंढरीनाथ पाटील, तालूका प्रमुख सुनील पाटील, भडगाव तालुका प्रमुख संजय पाटील, पाचोरा तहसीलदार प्रवीण चव्हाणके,भडगाव तहसीलदार नितीन बनसोडे, पाचोरा मुख्याधिकारी मंगेश देवर,भडगाव मुख्याधिकारी रवींद्र लांडे, पाचोरा गटविकास अधिकारी डॉ स्नेहल शेलार, भडगाव गटविकास अधिकारी शे.अन्सार शे.अकबर,यावलच्या प्रकल्पाचे सहायक अधिकारी जावळे यांचेसह
युवा नेता सुमित पाटील, युवा सेना जिल्हाप्रमुख जितेंद्र जैन,महेंद्र ततार,बाजार समितीचे संचालक प्रकाश तांबे, राहुल पाटील, यांचेसह शहर प्रमुख सुमीत सावंत,भोला पाटील,सुधीर शेलार, हेमंत चव्हाण,सूनीता पाटील,महिला आघाडीच्या नंदा पाटील, अंजली चव्हाण,सुषमा पाटील, रत्ना पाटील, मंदा ताई पाटील,भारती महाजन ,सीमा महाजन,मंदाताई गंजे,सीमा पाटील, प्रियंका सोनवणे,संगीता पगारे, बेबाबाई पाटील
प्रवीण पाटील, सतिष पाटील, लोहारी
माजी नगरसेवक बापू हटकर, गंगाराम पाटील, ताई पाटील,माजी जि प सदस्य पदमसिंग पाटील, आबा पाटील,विजय भोसले, सौरव पाटील,भडगाव यांची उपास्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ब आभार प्रवीण ब्राह्मणे यांनी मानले

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: CALL ME 8411009377 \\\\