लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्थेत विठ्ठल माऊली महाजन यांचा वाढदिवस साजरा.
पाचोरा – येथे लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व वारकरी विद्यार्थ्यांन सोबत ह.भ.प विठ्ठल महाजन माऊली यांचा वाढदिवस विद्यार्थ्यी तसेच वारकरी शिक्षण संस्थेचे ह.भ.प योगेशजी महाराज व ह.भ.प सुनिता ताई महाराज यांनी वाढदिवस साजरा केला. वारकरी शिक्षण संस्थेच्या विविध कार्यक्रमात कायम मदत व सेवा सहकार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते श्री.विठ्ठल एकनाथ महाजन (माऊली) पाचोरा यांच्या वाढदिवसानिमित्त पांडुरंग विठ्ठल रखुमाई माता यांची मृर्ती व शाल पुष्पगुच्छ देऊन सर्व लहान बाळ गोपाळांनी आनंद घेतला.या शिक्षण संस्थेत अनाथ मुलांना वारकरी संप्रदाय किर्तनकार महाराज होण्यासाठी शिक्षण दिले जाते.अश्या पवित्र धार्मिक ज्ञान मंदीरात वारकरी बाळ गोपाळांन सोबत माझा वाढदिवस साजरा होत आहे हे माझे मोठे भाग्यचं आहे असं विठ्ठल महाजन म्हणाले यावेळी संस्थेचे सर्व विद्यार्थी व सहकारी भाविक भक्त उपस्थित होते.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377