श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा येथे वृक्षारोपण व गणवेश वाटपाचा कार्यक्रम संपन्न
पाचोरा – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा येथे दि. २३ जुलै रोजी गणवेश वाटप व वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी संस्थेचे चेअरमन मा.नानासाहेब श्री.संजयजी वाघ, व्हाईस चेअरमन मा.नानासो.श्री. व्हीं. टी.जोशी, शालेय समिती चेअरमन मा.दादासो.श्री.खलील देशमुख, तांत्रिक विभागाचे चेअरमन मा.अण्णासो. श्री. वासुदेव महाजन, संस्थेचे ज्येष्ठ संचालक मा.आप्पासो. श्री. सतीश चौधरी, मा.बापूसो.श्री. प्रकाश पाटील, मा.ताईसो.सौ. जिजाबाई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
शाळेच्या विविध उपक्रमांना व कार्यक्रमाना सढळ हस्ते मदत करणारे वैद्यकीय, सामाजिक, शैक्षणिक, व व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर डॉ.मा.श्री. नरेश गवांदे, डॉ. मा.श्री. अमोल जाधव, मा.श्री.ओम शेठ राठी, मा. श्री.रवी अग्रवाल मा.श्री. अनुराग भारतिया, मा. श्री. योगेश पाटील यांच्या हस्ते गणवेश वाटप व वृक्षारोपण करण्यात आले.
.. संस्थेचे व्हॉइस चेअरमन नानासो.श्री व्हि.टी. जोशी यांनी संस्थेसाठी 50 वर्षे योगदान दिले त्याबद्दल शालेय समिती चेअरमन मा. दादासो. श्री.खलील देशमुख यांच्या हस्ते त्यांचा स्वागत व सत्कार करण्यात आला.
तसेच वरील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्व मान्यवरांचा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते स्वागत व सत्कार करण्यात आला.
. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पी.एम. वाघ मॅडम, उपमुख्याध्यापक श्री. एन. आर. ठाकरे सर, पर्यवेक्षक श्री. आर. एल. पाटील सर, श्री. ए.बी.अहिरे सर,सौ.अंजली गोहील मॅडम, श्री. आर.बी.तडवी सर, तांत्रिक विभागाचे प्रमुख श्री.एस. एन. पाटील सर, किमान कौशल्य विभागाचे प्रमुख श्री.मनीष बाविस्कर सर, ज्येष्ठ शिक्षिका सौ.संगीता पाटील मॅडम, कार्यालयीन प्रमुख श्री. अजय सिनकर उपस्थित होते.
. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. आर. बी. बोरसे सर यांनी केले.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377