आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
शेती विषयक (FARMING)
Trending

कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी ओळख व व्यवस्थापन

जळगाव – जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापसाचा पेरा झाला आहे. शेतकऱ्यांना योग्य वेळी कापसावर पडणारी बोंडअळी ओळखता यावी. ओळखल्या नंतर त्याच प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय करता येईल. यासंदर्भातील ओळख करून देणारा हा लेख…!!

प्रादुर्भाव कसा ओळखावा – उघडलेल्या बोडावरती डाग – हे गुलाबी बोंडअळीचे प्रमुख लक्षण आहे ही लक्षणे सुरुवातीला येणा-या फुलोऱ्याच्या अवस्थेत आणि पिकाच्या वाढीच्या शेवटच्या अवस्थेत नुकसान झाल्यावर दिसून येते. कामगंध सापळ्यामध्ये नर पतंग अडकल्यास – कामगंध सापळ्याद्वारे मादी पतंगासारखा गंध सोडल्यामुळे नर पतंग आकर्षित होतात हे कृत्रिमरित्या बनवलेल्या सापळे गुलाबी बोंडअळीची पाहणी आणि प्रादुर्भाव ओळखण्यासाठी वापरतात. डोम कळी – फुले पूर्णपणे उमलत नाहीत ते मुरडले जातात.हिरव्या बोंडावर दिसणारे डाग – हे डाग गुलाबी बोंडअळी प्रादुर्भावाचे लक्षण आहे. हिरव्या बोंडावर दिसणारे निकास छिद्र : अंदाजे 1.5 ते 2 मिमि व्यासाचे लहान निकास छिद्र बोंडावर असल्यास गुलाबी बोंडअळी उपस्थित असल्याचे कळते.

त्याचे व्यवस्थापन कसे करावे -> कामगंध सापळे : ऑगस्ट महिन्याच्या मध्यापासूनच गुलाबी बोंडअळीच्या पाहणीसाठी कामगंध सापळे प्रति हेक्टर लावावेत. कामगंध सापळयात जर कमीतकमी २४ पतंग प्रति सापळा तीन रात्रीत अडकले असल्यास किंवा १० हिरव्या बोंडाचे नुकसान (आर्थिक नुकसानीच्या पातळी) झाले असेल तर उपलब्ध असल्यास ट्रायकोग्रामा बॅक्टेरी किंवा ब्रॅकॉन परजीवी चा शेतात वापर करावा अथवा किटकनाशकांचा वापर शेवटचा पर्याय म्हणून खाली दिल्याप्रमाणे करावा. बागायती कापसामध्ये प्रत्येक झाडाला ८-१० हिरवी बोंडे असतील तरच फवारणी करावी. कापसाची वेचणी पूर्ण झाल्यानंतरच हिरव्या बोडाच्या संरक्षणासाठी फवारणी करावी. सामुहिक पतंग पकडणे – कामगंध सापळयाचा वापर करून मोठ्या प्रमाणात सामुहिकरित्या नर पतंग पकडल्यास गुलाबी बोडअळीचा प्रादुर्भाव कमी होईल. प्रकाश सापळे शेतात, वखारभोवती, जिनिंग मिल्स, मार्केट यार्ड भोवती हंगामात लावल्यास गुलाबी बोडअळीचा प्रार्दुभाव कमी होईल.सप्टेंबर महिन्यात किटकनाशक क्विनॉलफॉस २०% एएफ किंवा थयोडीकार्ब ७५% डब्लूपी मात्रा प्रती १० लिटर पाणी २० मिली २० ग्रॅाम ऑक्टोबर ते नोव्हेंबर – क्लोरपायरीफॉस २०% ईसी किंवा थायोडीकार्ब ७५% डब्लूपी २५ मिली २० ग्रॅाम डिसेंबर – फेनव्हरेट २०% ईसी किंवा सायपरमेथ्रीन १०% १० मिली १० मिली – पावर स्प्रे साठी किटकनाशकाची तिप्पट मात्रा घ्यावी असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जळगाव यांनी सांगितले आहे.

credit – जिमाका, जळगाव

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: CALL ME 8411009377 \\\\