नानासाहेब प्रताप हरी पाटील यांच्या प्रचारार्थ पिंपळगाव हरेश्वर येथे 5 ठिकाणी कॉर्नर सभा उत्साहात संपन्न
कॉर्नर सभेला प्रभावित होऊन असंख्य कार्यकर्त्यांचा पक्षात प्रवेश
पाचोरा – पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार नानासाहेब प्रताप हरी पाटील यांच्या प्रचारार्थ पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर या गावांमध्ये बाजार चौक,यमुना नगर,शंकरपुरा, इंदिरानगर, अरुण नगर अशा पाच ठिकाणी या कॉर्नर सभा घेण्यात आल्या या सभेच्या माध्यमातून नानासाहेब प्रताप हरी पाटील यांच्या कार्याची ओळख व महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे ध्येय धोरण या वेळी मांडण्यात आले यासाठी पक्षाचे प्रवक्ते चंद्रकांत ठाकरे,महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे जिल्हा निमंत्रक चेतन पाटील, स्वराज्य पक्षाचे सदस्य दीपक भोसले, भडगाव तालुका अध्यक्ष प्रतीक पाटील, सदस्य गौतम बाविस्कर इत्यादी वक्त्यांनी या सभा गाजवल्या या *कॉर्नर सभेला प्रभावित होऊन असंख्य कार्यकर्त्यांनी या पक्षात प्रवेश केला* यावेळी स्थानिक युवा कार्यकर्ते सचिन जाधव, चेतन पाटील, अनिकेत पाटील, किशोर आप्पा गरुड यांनी मोलाचे सहकार्य केले या कॉर्नर सभेसाठी उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला असून मतदारांनी या सभेसाठी सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती सभेचे यशस्वीतेसाठी दीपक भोसले यांनी अथक परिश्रम घेतले
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377