जळगाव जिल्हयातील अवैध वाळु उत्खनन व वाहतुक रोखण्यासाठी ग्रामदक्षता समितीची बैठक संपन्न
जळगाव, दिनांक 30 डिसेंबर : महसुल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर होणारे हल्ले व अवैध वाळु वाहतुकीदरम्यान होणा-या अपघांतावर नियंत्रण आणण्यासाठी ग्रामदक्षता समितीच्या सदस्यांची बैठक 30 डिसेंबर रोजी जळगाव येथील जिल्हा नियोजन समिती येथे संपन्न झाली. यात ग्राम दक्षता समितीने अवैध उत्खनन रोखण्यासाठी पुढाकार घेण्याचा जिल्हाधिकारी यांनी निर्देश दिले असून प्रशासनाकडून ग्राम दक्षता समितीस पूर्ण सहकार्य केले जाईल असे सांगितले.
या बैठकीला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी भिमराव दराडे, उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे उपस्थित होते.
जळगाव जिल्हयात अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याकामी स्थापन करण्यात आलेल्या महसुल विभागातील पथकातील अधिकारी / कर्मचारी यांच्यावर मोठ्याप्रमाणात हल्ले होत आहेत. तसेच अवैध बाळु उत्खनन व वाहतुकीदरम्यान महामार्ग व इतर रस्त्यावर अवैध वाळूचे डंपर, ट्रॅक्टर यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यावरील उपयोजनाकरिता या बैठकित चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ग्राम दक्षता समितीने गौणखनिज रक्षणासाठी पुढाकार घ्यावा, त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण सहकार्य केले जाईल असे सांगितले. जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनीही पोलिसांना याबाबत कारवाई करण्याबाबत तसेच ग्रामदक्षता समितीला मदत करण्याबाबतच्या सूचना दिल्या.
जळगाव जिल्हयातील जळगाव, एरंडोल, धरणगाव, मुक्ताईनगर, अमळनेर, पाचोरा, भडगाव, चाळिसगाव या तालुक्यातील गावांच्या तलाठी व पोलिस पाटील, तहसिलदार, ग्रामसेवक व सरपंच तसेच संबंधित तहसिलदार, गटविकास अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव, पोलिस निरीक्षक या बैठकीला उपस्थित होते. याप्रसंगी सर्व गावातील सरपंच यांना सुचना देण्यात आल्या. अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी दिली.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377