आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र

जळगावच्या एमआयडीसीतील चटई कंपनीस लागलेली आग आटोक्यात ; जिल्हाधिकारींनी पाहणी करत दिल्या सूचना

जळगाव, दिनांक 30 डिसेंबर : जळगाव येथील औद्योगिक वसाहतीमधील सिद्धिविनायक इंडस्ट्रियल डी 66/1 येथील प्लास्टिक चटई कंपनी व सूर्यफूल बियाणे असलेल्या कंपनीला रविवार (दि.29) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आगीत लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटना स्थळी पाचारण केले. घटना स्थळी पोहचताच आगेवर फोम व पाणीचा मारा करत अग्निशमन कर्मचार्‍यांनी आग आटोक्यात आणली.

जळगाव शहर महानगरपालिका जळगाव यांच्या तीन गाड्या, जामनेर नगरपालिका ,भुसावळ नगरपालिका ,वरणगाव नगरपालिका, वरणगाव ऑडनस फॅक्टरी, भुसावळ ऑडनस फॅक्टरी व जैन इरिगेशन दोन गाड्याच्या साह्याने (फायर फायटर)आगेवर नियंत्रण मिळवणे लवकर शक्य झाले. सकाळी 5 वाजेपर्यंत अग्निशमन कार्य सुरू होते. या आगीत कोणतीही जिवितहानी झालेली नाही.

जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी,श्री.भीमराज दराडे, उपअधीक्षक (गृह) श्री संदीप, अग्नीशमन अधिकारी मनपा श्री.शशिकांत बारी. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री.नरवीर रावळ यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत घटनेची माहिती घेतली व कर्मचाऱ्यांना सुचना केल्या. जिल्हाधिकारी यांनी स्वतः पाहणी करून सुप्रीम कंपनीच्या क्रेन द्वारे कंपनीच्या दोन्ही बाजूच्या भिंती पाडून आतील सूर्यफुल बियाणे आणि चटईसाठी लागणाऱ्या प्लास्टिकच्या कच्च्या मालाला व ग्रँन्यूअलला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मार्गदर्शन केले.

आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे अधिकारी /कर्मचारी श्री. शशिकांत बारी सर अग्निशमन अधिकारी, श्री. अश्वजीत घरडे , वाहन चालक निवांत इंगळे , वाहन चालक देविदास सुरवाडे, वाहन चालक नंदकिशोर खडके, वाहन चालक नासिर अलीदादा , वाहन चालक संजय भोईटे,भारत बारी ,विजय पाटील, पन्नालाल सोनवणे, तेजस जोशी,मनोज तिरवड, हर्ष शिंदे ,नितीन ससाने, निलेश सुर्वे, गिरीश खडके, सरदार पाटील, योगेश कोल्हे या सर्वांनी आग विझवण्यास मदत केली.

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: CALL ME 8411009377 \\\\