
पाचोरा:- सर्वोच्च न्यायालयाचे न्या.श्री भूषणजी गवई साहेब यांच्यावरील हल्ल्याचे निषेधार्थ व दोषींवर कठोर कारवाई करावी यासाठी दि पाचोरा लॉयर्स असोसिएशने पाचोरा तर्फे तहसीलदार यांना निवेदन सादर केले
पाचोरा न्यायालयातील वकील बांधवांनी निवेदनात सह्या करीत दिनांक 6/10/2025 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे नामदार न्यायमूर्ती सीजीआय श्री भूषणजी गवई साहेब यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचा व भारतीय संविधानावर हल्ला करनाऱ्या विकृतीचा जाहीर निषेध करत,तसेच सदर कृत्य करणाऱ्या राकेश किशोर या वकीलवर शासनाने फिर्यादी होऊन गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे
सदर घटनेच्या माध्यमातून धर्मांध व जातीयवादी विचार या देशाला व देशाच्या संविधानाला संपवण्याची मानसिकता रुजवण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे. या कृतीला किरकोळ कृती म्हणून शासनाने दुर्लक्षित करू नये. अन्यथा देशात कायद्याचा व न्याय मंडळाचा धाक भारताच्या नागरिकांमध्ये राहणार नाही म्हणून शासनाने अत्यंत कठोर कायदा करून या विकृतींचा बिमोड करावा ही विनंती देखिल निवेदणाच्या माध्यमातून केली आहे

या साठी ॲड.अभय पाटील अध्यक्ष दि पाचोरा लॉयर्स असोसिएशन पाचोरा यांनी आपल्या सहकार्यांन सोबत अशा विकृत प्रवृत्तीला वेळीच ठेचून काढावे व भविष्यात अशा घटनांना आळा बसून अशी हिम्मतच कुनीही करू नये त्यासाठी उचलेले हे पाऊल वाखान्याजोगे आहे.शिवाय विशिष्ट कारनाने सदर विकृत व्यक्तीने अशी निंदनीय घटना घडवणे ही लोकशाहीला व भारतीय राज्य घटनेला अनुसरून व अपेक्षित नसून अशा विशिष्ट प्रभावाणे प्रेरित झालेल्यांना कडक शासन झाले पाहिजे
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



