आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र

गुन्हे शोध पथकाची उत्तम कामगीरी ४ तासात आरोपीस जेरबंद करुन चोरी गेलेली मोटार सायकल केली जप्त .


पाचोरा – दिनांक ०४/११/२०२५ रोजी दुपारी १३.३० वा. चे दरम्यान फिर्यादी नामे मनोज डिगंबर जाधव, वय. ३० वर्षे, धंदा. मेडीकल, रा. भोजे चिंचपुरे, ता. पाचोरा, जि. जळगांव हे जारगांव चौफुली येथे त्यांची बजाज कंपनीची काळया रंगाची प्लॅटीना मो.सा. क्रमांक MH-19 CP-0869 ही पार्क करुन फळ घेणेसाठी गेले असता कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्यांचे संमतीशिवाय लबाडीचे इरादयाने वरील मोटार सायकल ही चोरी करुन चोरुन घेवुन गेले बाबत पाचोरा पोलीस ठाणेस गु. रजि. क्रमांक ५१२/२०२५ भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे दिनांक ०५/११/२०२५ रोजी १५.०१ वा. दाखल आहे.
सदर गुन्हयाचे अनुषंगाने पाचोरा पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोहेकॉ/०६२५ राहुल काशिनाथ शिंपी, पोकॉ / १२३० योगेश सुरेश पाटील, पोकॉ/१४२२ शरद मांगो पाटील, पोकॉ/३२६३ गणेश प्रल्हाद कुवर, पोकॉ / ०१३२ श्रीराम अनिल शिंपी यांनी सीसीटीव्ही फुटेज व गुन्हयाचे तांत्रीक विश्लेषणाचे आधारे तसेच गुन्हयाचा तपास चालू असतांना संशयीत इसम हा कृष्णपुरी परीसरात फिरत आहे अशी गुप्त बातमीदाराने पोका / १२३० योगेश सुरेश पाटील यांना बातमी दिल्याने बातमीप्रमाणे कृष्णपुरी येथे जावुन दबा धरुन बसले असता एक इसम संशयीतरित्या फिरतांना दिसल्याने त्यास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव, गाव विचारता त्याने त्याचे नाव भगवान लक्ष्मण पाटील, वय ३५ वर्षे, रा. पिंप्री खुर्द प्र. ता. पाचोरा, जि. जळगांव असे सांगुन त्यास विश्वासात घेवुन पोलीस ठाणे येथे आणून त्याची गुन्हयाचे संदर्भात प्राथमिक चौकशी करता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास सदर गुन्हयात अटक करुन तपासात त्याने गुन्हयात चोरलेली ४५,०००/- रुपये किंमतीची एक बजाज कंपनीची काळया रंगाची प्लॅटीना मो.सा.क्रमांक MH-19 CP-0869 ही त्याने चोरी केल्याचे कळविल्याने त्याचेकडुन वरील मोटार सायकल ही हस्तगत करण्यात आलेली आहे.

सदर गुन्हयाचा तपास पोहेकॉ / ०६२५ राहुल काशिनाथ शिंपी हे करीत आहेत.सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधीक्षक सो, श्री. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक सो, चाळीसगांव परिमंडळ श्रीमती कविता नेरकर, उप विभागीय पोलीस अधिकारी सो, श्री. बापु रोहम यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. राहुलकुमार पवार, पोहेकॉ / ६२५ राहुल काशिनाथ शिंपी, पोकॉ / १२३० योगेश सुरेश पाटील, पोकॉ / १४२२ शरद मांगो पाटील, पोकॉ / ३२६३ गणेश प्रल्हाद कुवर, पोकॉ / ०१३२ श्रीराम अनिल शिंपी यांनी पार पाडली आहे.

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: CALL ME 8411009377 \\\\