आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र
Trending

निर्धार मेळावा काय सांगून जाईल, या प्रश्नांचा ठाव लागेल?

पाचोरा :- आमदार किशोरआप्पा पाटील यांचा शनिवार रोजी दिनांक एक नोव्हेंबरला होउ घातलेला शिवसेना शिंदे गटाचा पाचोरा भडगाव मतदार संघासाठी चा निर्धार मेळावा व अभिष्टचिंतन सोहळा  आज पर्यंतच्या ईतीहासातील आगळा वेगळा ठरणार असल्याने मतदार संघातील तमाम पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक व नव्याने पक्ष प्रवेश घेऊ इच्छिणारे तसेच आमदार किशोर आप्पा पाटील यांचे चाहते लाभार्थी,कंत्राटदार असे सर्वच लोक या निर्धार मेळाव्या साठी हजेरी लावणार असल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे ज्या प्रमाणात आमदार किशोरआप्पा पाटील यांनी सबंध महाराष्ट्रातून प्रथमच आपल्या मतदार संघात स्थानिक स्वराज्य संस्थांन  मधील निवडणुकीत युती न करन्याचा  निर्णय घेतला आहे तो कितपत यशस्वी होईल हे येणार काळच सांगेल परंतु पाचोरा भडगाव मतदार संघातील संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुका या स्वतंत्र लढणार व युती करणार नाही याबाबत त्यांनी प्रसार माध्यमांमध्ये आधीच डिक्लेअर केलेले असल्याने आता फक्त सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांचा पाठिंबा आहे ही बाब या निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून आमदार साहेब  नक्कीच जाणून घेणार असल्याने येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये यश मिळवणे कठीण नाही यासाठी सर्वप्रथम किशोरआप्पा  पाटील हे शक्तिप्रदर्शन करताना दिसतील यात काही शंका नाही.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपा विरुद्ध लढणे वाटते तितके सोपे  जरी नसेल याची जाणीव आमदार साहेबांना आहेच शिवाय विधानसभेतील सर्व पराभूत उमेदवार यांनी भाजपात प्रवेश करून वज्र मूठ आवळलेली आहेच, तसेच विधानसभेतील पराभवाचा वचपाही या निवडणुकांमध्ये काढायचा आहे असे जरी  असले तरी त्यामुळे सर्व लढती या तुल्यबळ होतील यात काही शंका नाही परंतु उभय पक्षांन मधील वाढत चाललेला हा दुरावा की खुर्चीचा लोभ हा अर्थबोध ज्याने त्याने भूतकाळातील घडलेल्या गोष्टींमधून लावून घ्यावा. सदर निर्धार मेळाव्यात अनेक गोष्टींची उकल कदाचित आमदार किशोरआप्पा पाटील करतील, भविष्यातील त्यांची राजकीय वाटचाल काय असेल हे आजच्या दिवशी जनतेसमोर नक्कीच आलेले दिसेल व पुढील सर्वच निवडणुकांन मध्ये उमेदवार कोण व कसे असेल जुने कार्यकर्त्यांना न्याय मिळेल ? , तिकीट वाटपांचे कसे ,नवे आले पण जूना कार्यकर्ता कसा टिकवून ठेवावा याचीही कसरत होणार हे बघणेही उत्सुकतेचे ठरणार आहे.

आमदार किशोरआप्पा पाटील यांनी केलेली हजारो कोटींचे विकास कामे आज कदाचित महाराष्ट्रातील बड्या नेत्यान खेरीज कुठेच झालेली दिसत नाहीत शिवाय त्यांची कार्य पद्धती ही त्यांचे यशाचे सूत्र प्रतिबिंबित करते हे स्पष्ट करणेही गरजेचे वाटते शिवाय त्यांना पक्षातील सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी, हितचिंतक, संपर्कातील नागरिक,मित्रपरिवार,चाहते हे देखिल तितक्याच तत्परतेने सहाय्य करतात आणि  संघटनेत,पक्षातही त्यांची बाजू भक्कम असल्याने ते घेतील तो निर्णय निर्धार बनुन जातो ही आज वरच्या यशस्वी घटनांनी समोर आलेच आहे म तो उबाठा सोडून शिंदे गटा सोबत जाण्याचा घेतलेला यशस्वी निर्णय का असेना.

आज रोजीचा त्यांचा निर्धार मेळावा आणि असलेला वाढदिवस यासाठी त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमचे चॅनेल मार्फत देत असून त्यांना चांगले आरोग्य लाभो हीच सदिच्छा — मु.संपादक उमेश राऊत.

https://www.youtube.com/shorts/vY1Ru1k-_7c?feature=share

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377

बातमी लाईक  करा,शेअर करा

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: CALL ME 8411009377 \\\\