आ.किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्पर्धांचे आयोजन.

पाचोरा – दिनांक एक नोव्हेंबर रोजी आमदार किशोर आप्पा पाटील यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने मतदारसंघात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहेत.किशोर आप्पा पाटील बहुउद्देशीय संस्था पाचोरा तसेच द युनिक अकॅडमी शाखा जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पाचोरा भडगाव तालुक्यातील विद्यर्थ्यांसाठी मोफत व खुली सामान्य ज्ञान स्पर्धा, रविवार दिनांक 2 नोव्हेंबर 2025 सकाळी 11 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती समोर व्यापारी भवन पाचोरा येथे आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेत विजेत्यांना बक्षीस तसेच 3 ते 7 नोव्हेंबर या कालावधीत यूपीएससी आणि एमपीएससी बाबत मोफत मार्गदर्शन हे यूनिक अकॅडमी जळगाव या शाखेत मिळणार आहे. परीक्षा ही ऑफलाईन स्वरुपात असेल, विद्यार्थयानी एक तास आधी उपस्थित राहावे,परीक्षा अकरा वाजता वेळेवर सुरु होईल, परीक्षेसाठी एक तासाचा कालावधी असेल, परीक्षेत मोबाईलचा वापर करता येणार नाही, शंभर प्रश्नांची परीक्षा असून त्यामध्ये जनरल नॉलेज, या विषयावर आधारित प्रश्न विचारले जातील.
यासाठी ऑनलाईन लिंकद्धारे नोंदणी करणे आवश्यक आहे ज्यांनी ऑनलाईन नोंदणी केली नाही त्यांना परीक्षेत बसता येणार नाही परीक्षेसाठी वयोमर्यादा असेल 18 ते 34 वर्ष, पाचोरा भडगाव मतदार संघातील विद्यार्थ्याना किशोर आप्पा पाटील बहुउद्देशीय संस्था यांच्या तर्फे आवाहन करण्यात येते की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षेचा लाभ घ्यावा ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी गुगल लिंकला भेट देऊन सर्व माहिती भरून आपला प्रवेश निश्चित करावा.
https://forms.gle/V9iZm4MJ8mNSqMq97https://forms.gle/V9iZm4MJ8mNSqMq97
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
बातमी व जाहिराती साठी संपर्क Z4 NEWS- मुख्य संपादक- उमेश राऊत. मो : 8411009377
बातमी लाईक करा,शेअर करा



