आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
आपला जिल्हा

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात ऑलिंपिक दिन साजरा

                जळगाव दि. 25 – जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव मार्फत 23 जुन हा जागतिक ऑलिंपिक दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सर्वप्रथम भारताचे सुविख्यात धावपटू पद्मश्री मिल्खा सिंग यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडू सुमेध तळवेलकर, प्रितेश पाटील, कल्पेश कोल्हे, अक्षय येवले, नेहा देशमुख, प्राची नाईक, शिवानी देशमुख, रचना म्हस्के या आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा पुष्पगुच्छ देऊन जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षित यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

                23 जुलै ते 5 सप्टेंबर, 2021 या कालावधीत टोकीयो येथे आयोजित होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धे‍त राही सरनोबत (पिस्तुल शुटींग), अविनाश साबळे (ॲथलेटिक्स), चिराग शेट्टी (बॅडमिंटन), विष्णू सरवानन (सेलींग) तेजस्विनी सावंत (रायफल शुटींग), प्रविण जाधव (आर्चरी रिकर्व्ह), स्वरुप उन्हाळकर (पॅरा शुटींग 10 मी. रायफल), सुयश जाधव (पॅरा स्विमिंग) हे महाराष्ट्राचे आठ खेळाडू सहभागी होणार आहेत. या खेळाडूना शुभेच्छा व प्रोत्साहन देण्याकरीता तसेच जिल्ह्यामध्ये खेळाविषयी वातावरण निर्मिती व्हावी, याकरिता जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे महाराष्ट्र राज्याचे ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूचे छायाचित्र असलेले बॅनर लाऊन राष्ट्रीय खेळाडूंच्या हस्ते त्याचे अनावरण करण्यात आले. अशाप्रकारचे बॅनर पूर्ण जिल्ह्यात लावण्यात येऊन समाजामध्ये खेळाविषयी वातावरण निर्माण करण्यात येणार आहे.

                याप्रसंगी शिवछत्रपती पुरस्कारार्थी डॉ. प्रदीप तळवेलकर, क्रीडा अधिकारी एम. के. पाटील, रेखा पाटील, क्रीडा मार्गदर्शक अरविंद खांडेकर, मिनल थोरात, भरत देशमुख, गोविद सोनवणे, विनोद माने, विनोद कुलकर्णी, सुरज पवार हे उपस्थित होते.

                सदर कार्यक्रमात शिवछत्रपती पुरस्कारार्थी डॉ. प्रदीप तळवेलकर व जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षित यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन केले व ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्याचे  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

.

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!