आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
महाराष्ट्र
Trending

पाचोऱ्यात “शिवसेना” व “धनुष्यबाण” गोठविणाऱ्या राष्ट्रीय निवडणूक आयोगाचा केला जाहिर निषेध….!

पाचोरा,दि १० -पाचोरा येथे,शनिवार दि.९/१०/२०२२ रोजी निवडणूक आयोगाने घाईघाईने पक्षाचे नांव “शिवसेना” व चिन्ह “धनुष्यवाण” गोठविले.निवडणूक  आयोगाच्या या  निर्णया विरुद्ध आज निषेध मोर्चा काढण्यात येऊन प्रांताधिकारी विक्रम बांदल यांना निवेदन देण्यात आले .वास्तविक पक्षाचे आवश्यक ती माहिती वेळेच्या आत निवडणूक आयोगाकडे पोहचवली होती व संपूर्ण विचारांती निर्णय घेण्याची विनंती केली होती.परंतु निवडणूक आयोगाने दबावाखाली घाईघाईने निर्णय घेवून पक्षाचे नाव “शिवसेना” व चिन्ह “धनुष्यबाण” गोठविले त्याबद्दल पाचोरा -भडगांव तालुका शिवसेना व युवासेनेच्या वतीने निवडणूक आयोगाचा जाहिर निषेध करत उत्स्फूर्त घोषणाबाजी करीत मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर धडकला.त्याच वेळी ज्यांच्या बंडखोरीमुळे सदरचा प्रकार घडला त्या मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या ४० सहकाऱ्यांचा जाहिर धिक्कार करीत,महाराष्ट्राचा  विकासासाठी,गोरगरीबांच्या कल्याणासाठी,हिंदुत्वाचा रक्षणासाठी, शिवसेनाप्रमख वंदनिय बाळासाहेब ठाकरे यांनी जिवाचे रान करुन प्रतिकुल परिस्थीतीमध्ये शिवसेना पक्षाची उभारणी करुन महाराष्ट्राची व देशाची सेवा अविरतपणे केली ती शिवसेना संपविण्याचे षडयंत्र करणाऱ्यांना जनता जनार्दन त्यांची जागा दाखविल्या शिवाय राहणार नाही. हा निकाल म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचे महापाप आहे. छत्रपती शिवरायांची महाराष्ट्राची पवित्र भुमी पापिंना क्षमा करणार नाही  या भावना प्रकट करीत सदर निकालाचा जाहिर निषेध करीत शिवसैनिकांच्या भावना शासन दरबारी कळवाव्यात अशा नम्र विनंतीसह निवेदन  देण्यात आले.

या निषेध मोर्चासाठी पाचोरा भडगाव शिवसेना ,युवसेना ,महीला आघाडी, शिवसेना प्रमुख पदाधिकारी पाचोरा-भडगाव वी.स.क्षेत्र, सौ.वैशालीताई सुर्यवंशी,दिपकसिंग राजपुत,अरुण रुपचंद पाटील,अॅड.अभय पाटील,रमेश बाफना,शरद रमेश पाटील, दिपक पाटील,गोरख पाटील,जे.के.पाटील,अनिल पाटील,शाम पाटील सर, शंकर मारवाडी,माधव जगताप,संदिप जैन व असंख्य शिवसैनिक तर संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष प्रवीण पाटील ,ता.अध्यक्ष जिभाऊ पाटील यांचे सह अनेक कार्यकर्ते यांनी या वेळी मोर्चात सहभाग नोंदवला.   

बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber


बातमी व जाहिराती साठी संपर्क
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!