जळगाव शहरातील राष्ट्रीय महामार्गावर खोटे नगर येथे लवकरच अंडरपास-खासदार उन्मेशदादा पाटील
कार्यस्थळावर घेतली अधिकाऱ्यांची झाडाझडती
जळगाव – गेल्या अनेक दिवसांपासून मानराज पार्क स्टॉप, तसेच खोटे नगर अडरपास मंजूर करण्याबाबत स्थानिक नगरसेवकांचा मोठा पाठपुरावा सातत्याने खासदार उन्मेश दादा पाटील यांच्याकडे सुरू होता. तसेच डॉ.अग्रवाल हॉस्पिटल जवळील व डॉ. कोल्हे यांच्या हॉस्पिटल समोर गटारीच्या कामात चुकीच्या पद्धतीने डायरेक्शन दिल्याने डॉ. कोल्हे यांच्या हॉस्पिटलजवळ पाणी साचण्याची मोठी समस्या निर्माण झाली होती या अनुषंगाने खासदार उन्मेशदादा पाटील यांनी महामार्गाचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा यांना घटनास्थळावर बोलावून या भागातील नगरसेवक तसेच आमदार तथा जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे यांच्या समक्ष ही कामे तातडीने मार्गी लावा अन्यथा माझ्याशी गाठ असल्याची धमकी वजा आदेश दिल्याने अखेर खोटेनगर अंडरपासला लवकरच सुरू होणार आहे.
जळगाव शहरातून भारतीय राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक 53 असल्याने अनेक ठिकाणी वाढत्या शहराच्या दृष्टिकोनातून अंडरपासची गरज असल्याचे खासदार उन्मेशदादा पाटील यांनी देशाचे रस्ते व महामार्ग मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांच्याकडे समक्ष भेटून पत्रव्यवहार केला होता. या अनुषंगाने 162 कोटी रुपयांचा नवीन डीपीआर तांत्रिक मान्यतेसाठी तयार झाला आहे. तसेच सद्यःस्थितीत शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या कामात वाढत्या शहराच्या दृष्टिकोनातून अनेक ठिकाणी नवीन अंडरपास ची गरज निर्माण झाली होती. यापूर्वी देखील खासदार उन्मेशदादा पाटील यांनी सातत्याने या खोटे नगर, मानराज स्टॉप तसेच अग्रवाल हॉस्पिटल समोर अंडरपास करण्याबाबत आज कमल वास्तू अपार्टमेंट समोरील उड्डाण पुलावर खासदार उन्मेशदादा पाटील यांनी हायवेचे प्रकल्प अधिकारी चंद्रकांत सिन्हा,अभियंते यांची झाडाझडती घेतली. मानराज पार्क स्टॉप, तसेच खोटे नगर अडरपास झालेच पाहिजे असे आदेश वजा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. नागरिकांची गैरसोय होता कामा नये, विकासाच्या कामात कुठलाही लोकप्रतिनिधी अडचण आणीत नसल्याने त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर कार्यवाही करण्याच्या आदेश यावेळी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा यांना दिले.
खासदार उन्मेश दादा यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कामाचा DPR मंजुरीकरिता सादर करावा तसेच संपूर्ण राष्ट्रीय महामार्गावरील विद्युत खांब उभारण्याचे काम तात्काळ सुरू करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) च्या अधिकाऱ्यांना मानराज पार्क येथे अंडरपास ची ड्रॉइंग तसेच खोटेनगर स्टॉप ते पाळधी बायपास हायवे चौपदरीकरण व रुंदीकरणाबाबत कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी स्थानिक जेष्ठ नगरसेवक आबासाहेब कापसे यांनी महामार्गावरील समस्या मांडल्या.याप्रसंगी नागरिकांसह महानगर भाजपाअध्यक्ष दीपक भाऊ सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, नगरसेवक सुरेश भाऊ सोनवणे, डॉ.चंद्रशेखर पाटील, मंडळ अध्यक्ष शक्ती महाजन, धरणगाव माजी तालुकाध्यक्ष अड.संजय महाजन सामाजिक कार्यकर्ते अतुल बारी,श्रीमती रेखाताई कुलकर्णी, महीला आघाडीच्या निताताई परदेशी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber