आपल्याला अशा प्रकारे जाहिरात करणे साठी संपर्क करा
शेती विषयक (FARMING)

१ नोव्हेंबर रोजी पाचोरा-भडगाव तालुक्यातील हजारो शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार-अमोल शिंदे

पाचोरा-दि.१ नोव्हेंबर रोजी मा.मंत्री आमदार गिरीश महाजन,भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे,खासदार उन्मेषदादा पाटील यांच्या नेतृत्वात,भारतीय जनता पार्टीच्या वतीने व भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे व भडगाव तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा किसान मोर्चाच्या माध्यमातून विविध मागण्यांसाठी पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकरी बांधव उद्या दिनांक १ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य शेतकरी मोर्चातून आपल्या समस्या मांडणार आहेत.सदर मोर्चातील प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे असतील.

१)ऐन खरीप हंगामाच्या शेवटी रब्बीच्या सुरुवाती साठी पाण्याची गरज असतांना ट्रान्सफार्मर वीज पुरवठा खंडित करून पुन्हा जोडणी करीता सक्तीची वीज वसुली थांबवावी.

२)शेतीला वीज पुरवठा करणारे ट्रांन्सफार्मर नादुरुस्त झाल्यावर त्वरित बदलून मिळावे व त्यासाठी सक्तीचे वीज बिल वसुली करु नये.

३)रात्री अपरात्री होणाऱ्या शेती वीजपुरवठा धोरणात तात्काळ बदल करून रात्री ऐवजी दिवसा शेतीला नियमित वीज पुरवठा करण्यात यावा.

४)अतिपावसामुळे जाहीर झालेल्या तुटपुंज्या मदत ऐवजी त्यात वाढ करून दिवाळी आधी शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई रक्कम जमा करावी.

५)पिक विमा योजना सन २०२०- २०२१ अंतर्गत कापूस, उडीद, मुंग, सोयाबीन, इ. नुकसानग्रस्त पात्र शेतकऱ्यांची रक्कम तात्काळ बँक खात्यात जमा करण्यात यावी.

६)सन २०१८ व सन २०१९ मध्ये आलेल्या चक्रीवादळ मुळे झालेल्या नुकसान भरपाईची प्रलंबित रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा करावी

७)भडगाव तालुक्यात जून २०१९ मध्ये झालेल्या वादळी वारा व गारपिटीची तसेच मार्च २०२१ मध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची रक्कम तात्काळ बँक खात्यात जमा करण्यात यावी

८)पाचोरा व भडगाव तालुक्यात जनावरांवरिल लम्पी या आजाराचा वाढता प्रादुर्भाव बघता प्रत्येक गाव पातळीवर जाऊन गुरांचे लसीकरण करण्यात यावी.

वरील मागण्या मोर्चाच्या माध्यमातून शासन दरबारी मांडण्यात येणार असल्याचे अमोल शिंदे यांनी सांगितले तसेच या ठाकरे सरकार च्या सुलतानी निर्णयाने शेतकरी बांधव पूर्णपणे अडचणीत सापडले असून, शेतकऱ्यांच्या शेतातील वीज तोडणी असेल सक्तीची वीजबिल वसुली,सतत ट्रांसफार्मर बंद पडल्यावर होणारे हाल,मागील काळातील प्रलंबित नुकसान भरपाई,रात्री-अपरात्री अनियमित पद्धतीने होणारा शेतीला वीज पुरवठा,अतिवृष्टी काळात जाहीर केलेली तोडक्या मदती ऐवजी वाढीव मदत,तसेच जनावरांवरील लम्पी आजाराचा वाढता प्रादुर्भाव या सर्व बाबतीत या तालिबानी सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात सुलतानी निर्णय घेतल्याने यंदाची दिवाळीही शेतकरी बांधवांच्या आयुष्यातील अंधारमय अशी काळी दिवाळी ठरेल.असे सांगत अमोल शिंदे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.या प्रसंगी जिल्हा सरचिटणीस तथा जि.प. सदस्य मधुकर काटे, जिल्हाचिटणीस सोमनाथ पाटील विधानसभा क्षेत्रप्रमुख हिम्मतसिंग निकुंभ,शहराध्यक्ष रमेश वाणी, किसान मोर्चा पाचोरा तालुकाध्यक्ष विश्वास पाटील,भडगाव तालुकाध्यक्ष यशवंत पाटील,सरचिटणीस गोविंद शेलार,संजय पाटील, दीपक माने,भाजयुमो तालुकाध्यक्ष मुकेश पाटील, शहराध्यक्ष समाधान मुळे,सुनील पाटील,भैया ठाकूरआदी पदाधिकारी उपस्थित होते.


बातमी लाईक  करा,शेअर करा

खालील YouTube लिंक वर क्लिक करून  Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा  

https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber

Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377

COMPLETE SOLUTION FOR YOUR NEED

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: CALL ME 8411009377 \\\\