महाराष्ट्रराजकीय
मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांसोबत आर्थिक व्यवहार करणारे व सद्या अटकेत असलेले मंत्री नवाब मलीक यांची मंत्रिमंडळातुन तात्काळ हकलपट्टी करावी
पाचोऱ्यात अमोल शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपा आक्रमक
पाचोरा-१९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील सहभागी गुन्हेगारांशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणी मंत्री नवाब मलीक यांना अटक करण्यात आली असून,कोर्टाने त्यांना ३ मार्चपर्यंत कोठडी दिली आहे.मा.मंत्री अनिल देशमुखांचा राजीनामा ताबडतोब घेणारे खा.शरद पवार नवाब मलिकांच्या बाबतीत काय निर्णय घेणार आहे.यावर सर्वांचे लक्ष लागले असून,यासंदर्भात आज दि.२४ फेब्रुवारी रोजी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी ने पाचोरा येथे आंदोलन करत १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील सहभागी गुन्हेगारांशी आर्थिक व्यवहार करणारे मंत्री नवाब मलीक यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ हकलपट्टी करत मंत्री पदाचा राजीनामा घ्यावा अश्या आशयाचे निवेदन तहसीलदारांना देऊन निषेध व्यक्त केला.
महाराष्ट्रातील राष्ट्रीय विचारांची जनता हे सहन करणार नाही.व हा राज्यासह देशाच्या अस्मितेचा विषय असुन हा संपूर्ण प्रकार गंभीर आहे.तसेच एनआयएच्या ऑपरेशन्समध्ये एक मोठी लिंक मिळाली, ज्यातून रियल इस्टेटचे व्यवहार हे मनी लॉड्रींगच्या माध्यमातून होत आहेत, हे लक्षात आले. ९ ठिकाणी सर्च केल्यानंतर काही बाबी पुढे आल्या. त्यातील एक प्रकरण हे मंत्री नवाब मलिक यांचे आहे. मंत्री नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्डच्या माणसांकडून जमीन घेतली. ज्यांची मालकी त्यांनी सांगितले की, त्यांना एकही पैसा मिळाला नाही. जेथे हसिना पारकर सौदा करीत होती, त्यांनी सुद्धा बयाण दिले आहेत. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीकडून महाराष्ट्रातील मंत्र्याने व्यवहार करण्याचे कारण काय ? जे लोक मुंबईत बॉम्बस्फोट करतात, अशांना या व्यवहारातून पैसे दिले जात असतील, ते अतिशय गंभीर आहे.
कोट्यवधीच्या रकमेच्या या सौद्यातील ५५ लाख रूपये हे हसिना पारकरला मिळाले.
कुठल्याही राजकीय पक्षाने राजकारण न करता, अशाप्रकाराला थारा देण्याची गरज नाही. उलट या कारवाईचे सर्वांनी समर्थन करायला हवे. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींचे बयाण ईडीने कारागृहात जाऊन घेतलेले आहे. देशाच्या शत्रूला मदत करणार्यांाची गय केली जाऊ नये. मंत्र्यांचा राजीनामा घेणार नसतील, तर राजकारणाचा स्तर खालावेल. देशाच्या शत्रूला मदत करणारे मंत्रिमंडळात राहतात, पूर्ण सरकार त्याच्या पाठिशी उभे राहते, याचा देशात संदेश चांगला जाणार नाही. हा राष्ट्राच्या सुरक्षेचा विषय आहे, राष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे.त्यामुळे नवाब मलिकांचा राजीनामा घेणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र भर तीव्र निदर्शने करेल असे उपस्थित भाजपा पदाधिकाऱ्यांनी सांगितले.याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस तथा जि.प.सदस्य मधुकर काटे,कृ.उ.बा.समिती मा.सभापती सतिष शिंदे,शहराध्यक्ष रमेश वाणी,पं.स.सदस्य तथा मा.सभापती बन्सीलाल पाटील, सरचिटणीस गोविंद शेलारभाजयुमो तालुकाध्यक्ष मुकेश पाटील,शहराध्यक्ष समाधान मुळे,नंदूबापू सोमवंशी,सुनील पाटील,किशोर संचेती,योगेश ठाकूर,राहुल गायकवाड,विरेंद्र चौधरी,शुभम पाटील,अक्षय मांडाळे,भावेश पाटील,नितीन भोसले,आदी पदाधिकारी उपस्थित होते.
बातमी लाईक करा,शेअर करा
खालील YouTube लिंक वर क्लिक करून Z4 NEWS चॅनेल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/channel/UC6F-QwUxPGQ6_CKicFqylAg?view_as=subscriber
Z4 NEWS
मुख्य संपादक- उमेश राऊत
मो : 8411009377